montesari Entertainment store
montesari Entertainment store
Entertainment store

Entertainment store – करी मनोरंजन जो मुलांचे

Entertainment store - करी मनोरंजन जो मुलांचे - भारतकुमार राऊत

Entertainment store – करी मनोरंजन जो मुलांचे

 

Entertainment store – करी मनोरंजन जो मुलांचे – भारतकुमार राऊत

6th May 2018


Entertainment store – करी मनोरंजन जो मुलांचे..!

 मुल साडे तीन वर्षाचे झाले की, अलिकडे केवळ भारतातल्या शहरांतच नव्हे,

तर निमशहरी व निमग्रामीण भागांतही त्याला शिशुवर्गात पाठवण्यात येते. तिथेच दोन-तीन वर्षे

काढल्यानंतरच पहिलीत प्रवेश मिळतो व रितसर शालेय शिक्षणाला सुरूवात होते. शाळा प्रवेशाच्या

आधीच्या या शिक्षणाची पद्धती शोधून तिची मांडणी करणाऱ्या व त्याचेही ‘विज्ञान बनवणाऱ्या

बालमानस-तज्ज्ञ मारीया माँटेसरी यांचा आज स्मृतिदिन! एखाद्या महिलेचे नाव बालमानस विज्ञान शाखेला

मिळण्याची फारच थोडी उदाहरणे असतील. माँटेसरी यांचे कार्य इतके महान की लहान मुलांच्या शाळेला

आता जगभर सर्वत्र ‘माँटेसरी’ असेच म्हटले जाते.


Entertainment store मारीया माँटेसरी यांचे जीवनही मुलांच्या कल्पनाशक्तीसारखे कुठेही भटकत व

भरकटही जाणाऱ्यासारखे होते. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १८७० मध्ये इटलीत शेअरवेल या गावात झाला.

वडिलांच्या वारंवार वेगवेगळ्या शहरांमध्ये बदल्या होत राहिल्याने मारीयाचे शिक्षणसुद्धा वेगवेगळया

शहरांत होत राहिले. कधी फ्लॉरेन्स तर कधी रोम अशी त्यांची भटकंती चालू होती. त्यांना गणिताची विशेष

गोडी व गतीही होती. त्यामुळे सुरुवातीला मारीयानी इंजिनियर होण्याचे ठरवले. पण पुढे त्यांना वनस्पतीशास्त्रात

गोडी वाटू लागली. नंतर त्यांना वैद्यकशास्त्राचे आकर्षण वाटले व त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.

Entertainment store 3
Entertainment store 3

मतिमंद मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करतानाच त्यांचे तिथल्याच एका


वैज्ञानिकाबरोबर प्रेमसंबंध जुळले व विवाहबाह्य संबंधांतूनच त्यांना मुलगा झाला. पण त्याला सोबत ठेवणे अशक्य होते.

त्यातच त्यांच्या प्रियकरानेही दगा दिला. या साऱ्याचा बालमनावर कसा व किती परिणाम होतो, हे मारीयांनी

स्वत:च्या घरातच पाहिले व त्यातूनच बालकांसाठी शिक्षणपद्धती कशी असावी, याचे संशोधन त्यांनी सुरू केले.

बालमानसशास्त्र व त्यांचे शिक्षण, विशेषत: बौद्धिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांसाठी विशेष शिक्षण पद्धती

याविषयात माँटेसरी विविध विद्यापीठे व संस्था यामध्ये भाषणे देऊ लागल्या. विसावे शतक सुरू होत असताना

त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. बालमनावर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना शिकवताना काय

पद्धती अवलंबावी व कोणती पथ्ये पाळावीत, याबद्दल माँटेसरींनी काही सूत्रे तयार केली. आजही ती वापरली जात आहेत.

montesari Entertainment store 2
montesari Entertainment store 2

शाळेत जाण्याचे वय होण्यापूर्वी बालकांना केवळ आपल्या वयोगटातील मुलांमध्ये मिसळता यावे व त्यांना

सामुहिक सहजीवनाचा सराव व्हावा, म्हणून Entertainment store – माँटेसरींनी अनेक खेळ, गीते,

नृत्य प्रकार तयार केले. तीच बालगीते आजही वापरली जात आहेत.

अशा माँटेसरी १९४० मध्ये भारतातही आल्या होत्या. त्यांनी मद्रासमध्ये (आताचे चेन्नई) चर्चासत्रे घेतली.

भारतात आणखी काही काळ व्यतीत करण्याचे त्यांनी ठरवले होते. पण त्याच काळात दुसऱ्या महायुद्धाला

तोंड फुटल्याने त्यांना परत जावे लागले.


उतरत्या वयातही झपाटल्यासारख्या त्या जगभर फिरत राहिल्या. नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीन वेळा

त्यांचे नामांकन झाले. मात्र अखेरपर्यंत त्यांना ते मिळाले नाहीच. 1952साली आजच्याच दिवशी नेदरलँड्समध्ये

वयाच्या 81व्या वर्षी मेंदूच्या रक्तस्त्रावामुळे त्यांचे निधन झाले.

शाळेत जाण्याच्या वयाच्या जगातील प्रत्येक बालकासाठी त्यांनी केलेले संशोधन व कार्य खरेच अमोल आहे.

मारीया माँटेसरींना आदरांजली !


 

 

– भारतकुमार राऊत

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
shivrajyabhishek - शिवराज्याभिषेक सोहळा 
Shivrajyabhishek din- शिवराज्याभिषेक सोहळा 
error: Content is protected !!
%d bloggers like this: