job option
job option
job option

job option – प्रभावी बायो -डेटा, नोकरी निवडीचे निकष कसे ठरवाल

job option - नोकरी निवडीचे निकष कसे ठरवाल

job option –प्रभावी बायो -डेटा

नोकरी निवडीचे निकष कसे ठरवाल

 

job option – नोकरी निवडीचे निकष कसे ठरवाल

 

 

 

 


प्रभावी बायो -डेटा ,नोकरीची तयारी ,मुलाखतीचा दिवस अशा बऱ्याच अडथळ्यांच्या

शर्यतीनंतर जेव्हा आपल्याला नोकरीची संधी मिळते तेव्हा कोणत्या- कोणत्या गोष्टींचा विचार

करणे जरुरी आहे किंवा आपण २-३ ठिकाणी नोकरीसाठी मुलाखत दिली आणि दोन

कंपन्यांनी एकाच वेळेस आपली निवड केली तर योग्य पर्याय कसा निवडता येईल ते बघूया .

त्यासाठी आपले प्राधान्यक्रम (Priorities) काय आहे ते स्वतःला स्पष्ट असणं महत्वाचं आहे.

एकापेक्षा जास्त job option पर्याय उपलब्ध असणे केव्हाही चांगलेच, पण मग न गोधळता योग्य निर्णय

घेणे जरुरी आहे. नोकरीवर रुजू होण्याआधी ह्या काही गोष्टी विचारात घ्या. नोकरीचा प्रस्ताव

आलेल्या कंपनीचा बाजारात असलेला नावलौकिक,प्रतिष्ठा (reputation),त्यांची साईझ ,

स्वरूप म्हणजे छोटी /मध्यम की मोठी कंपनी , नवीन आहे की व्यवस्थित जम बसलेली आहे

ह्याचा नीट विचार करणे जरुरी आहे.नवीन कंपनी असेल तर आपल्या स्वतःच्या विकासासाठी

(growth ) उत्तम पण मग पुढे अस्थिरता सुद्धा येऊ शकते. मोठी कंपनी छानच पण मग

आपलं काम /कार्य मर्यादित होऊ शकतं.

 

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

आपली शैक्षणिक पात्रता आणि इतर कौशल्य हे कामासाठी आवश्यक आहेत की नाही

म्हणजे आपण योग्य नोकरीसाठी योग्य व्यक्ती आहोत का हे बघा. job option कारण आता मिळणारा

हा अनुभव पुढच्या व्यवसायिक कारकीर्दसाठी महत्वाचा असतो. आपल्या क्षेत्रातला अनुभव

हा आपल्या बायो-डेटाचा मोलाचा मुद्दा ठरू शकतो हे विसरू नका. नोकरीचा महत्वाचा

भाग आहे पगार आणि तुम्हाला मिळणारे फायदे (benefits) म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सुट्ट्या, बोनस ,भत्ते

(allowance) मग त्यात विमा ,मेडिक्लेम,प्रवास भत्ता , जादा कामाचा मेहनताना (Overtime)हे आलेत . ह्या

सगळ्यांची काय तरतूद आहे त्याचा तुलनात्मक विचार करा. आपण नोकरीवर रुजू झाल्यावर कायमस्वरूपी

असू की काही महिने उमेदवारीचा काळ (Probation Period) असणार आहे ,हे समजवून घ्या . बऱ्याचदा

उमेदवारीच्या काळात फक्त पगार दिला जातो . पगारवाढ कधी ,कोणत्या आधारावर होते ,त्याची कार्यपध्दती

काय आहे , बढतीची संधी केव्हा हे नीट समजवून घ्या. आर्थिक गरज सर्वांचीच असते मग आपल्या अपेक्षेप्रमाणे

आणि गरजेनुसार मिळकत आहे का हे बघा. कामांच्या वेळा,कामाचे दिवस ,आपल्या घरापासून कचेरी पर्यंत

जाण्यासाठी लागणारा वेळ आणि उपलब्ध साधने , प्रवास खर्च असे वेळापत्रकाचे आणि होणाऱ्या खर्चाचे गणित

मांडणे हा नोकरी निवडीचा एक मुख्य घटक आहे. दररोज आपल्याला तेथे प्रवास करून जाणे मग ते पावसाचे

दिवस असो की इतर ,आपल्याला जमणार आहे की त्या दगदगीचा आपल्या तब्येतीवर परिणाम होणार हे बघणे

जरुरी, कारण तब्येतीवर परिणाम म्हणजे कामावर ,आपल्या कामगिरीवर ( performance) परिणाम हे

विसरू नका. कंपनीची संस्कृती कशी आहे, सहकारी वर्ग कश्या प्रकारे आपल्याशी वागतील ,ते आपल्याला संघ

सदस्य (Team member ) समजतील का ? ते मनमिळाऊ आणि सहकार्य करणारे असतील का ? ह्याचा जरा

अंदाज घ्या.आपले जे व्यवसायिक कारकिर्दीचे उद्देश ठरवले आहेत वा योजले आहेत ते साधण्यासाठी

आपल्याला कोणती कंपनी व्यासपीठ ठरू शकते ते बघा. आपल्या प्रगतीसाठी आणि वाढीसाठी येणाऱ्या

काळात काय संधी कंपनीकडे उपलब्ध आहेत त्याचा विचार करा.प्रशिक्षण हे आपल्याला नेहमीच अद्ययावत

ठेवते ,त्यासाठी कंपनीचे काही धोरण (policy )आहे का हे सुद्धा विचारात घ्या.


काम हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आयुष्य नव्हे पण त्याची आपल्या जीवनात निर्णायक भूमिका असते

,तेव्हा सर्व गोष्टींचा एकूणच विचार करणं महत्वाचं ठरतं.उद्योग क्षेत्र, कंपनीची साईझ ह्यापलीकडे जाऊन

आपली गरज आणि कंपनीचं सांस्कृतिक वातावरण ह्याची सांगड घाला. हे सुद्धा लक्षात घ्या की तुमचे सर्वच

निकष लागू होतीलचं असं नाही . कोणत्या निकषाला प्राधान्य द्यायचे ते ठरवा . तर कधी रुजू होताय नवीन

नोकरीवर ?

 

 

मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]
 

 

postboxindia.com
www.postboxindia.com

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
swami vivekanand
swami vivekanand – सुविद्य सुसंस्कृत स्वामी विवेकानंद
error: Content is protected !!
%d bloggers like this: