karad - वेणूताई चव्हाण
karad - वेणूताई चव्हाण
karad - वेणूताई चव्हाण

karad – यशवंतराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय वेणूताई चव्हाण  

karad - स्वर्गीय वेणूताई चव्हाण पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 

karad –  यशवंतराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय वेणूताई चव्हाण

 

karad – स्वर्गीय वेणूताई चव्हाण पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन  

 


All Jewelry 75% OFF

31/5/2021,

यशवंतराव चव्हाण व वेणूताईंचा विवाह २ जुन १९४२ रोजी झाला.चव्हाण कुटुंबाच्या घरात प्रवेश केल्या नंतर लवकरच त्या कुटुंबात समरस झाल्या.

 

त्याच वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला .१९४७ आली यशवंतराव पार्लमेंटरी सेक्रेटरी झाल्यामुळे मुंबईला गेले

 

आणि कुटुंबांची सगळी जबाबदारी वेणूताईंच्या वरती येऊन पडली. तुटपुंज्या उत्पन्नात एवढ्या मोठ्या कुटुंबाचा संसार वेणूताईंनी हालअपेष्टांची परवा न करता

सुखाने व आनंदाने करून दाखवला. वेणूताई हे सगळं कशा सांभाळत असतील याची काळजी यशवंतरावांना मुंबईत असे .त्यामुळे अधून मधून पत्र लिहून

ते वेणूताईंना कोणाकडून उदार ,ऊसणे घ्यायचे याबाबतच्या सूचना करीत.

१९५२ झाली यशवंतराव चव्हाण मंत्री झाले आणि karad सर्व पसारा घेऊन वेणूताई मुंबईल्या आल्या. पुढे चारच वर्षांनी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले.


All Jewelry 75% OFF

त्यांच्या राजकीय वाटचालीने वेग घेतला ,त्यामुळे संसारासाठी वेळ द्यायला यशवंतरावांना आता जमणार नव्हते ,याची वेणूताईंना जाणीव होती.

त्यामुळे मुंबईत आल्याबरोबर आपल्या सर्व कुटुंबाची जबाबदारी वेणूताईंनी स्वतः घेतली कोणतीही कुरबूर न करता त्यांनी ती यशस्वीरीत्या पार पाडली.

त्यांची खरी सत्वपरीक्षा १९६२ मधे दिल्लीत गेल्यानंतर सुरू झाली. यशवंतराव व वेणूताई यांचे वैवाहिक जीवन पूर्णपणे वेगळे होते .


All Jewelry 75% OFF

कारण या दोघांनी आखून घेतलेली लक्ष्मण रेषा. यशवंतरावांच्या सरकारी कामात राजकारणात वेणूताई कधीच लक्ष देत नव्हत्या.

यशवंतराव चव्हाण ही वेणूताईंच्या कौटुंबिक व्यापात अजिबात लक्ष घालत नसत. वेणूताई सर्वकाही छान निभावत. खरेतर यशवंतराव आणि वेणूताई

एक दुजे के लिये बनले होते. दोघांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. महत्त्वाचे म्हणजे दोघांनाही परस्परांच्या स्वभावाचे पुर्ण आकलण होते.

यशवंतराव साहेबांच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या कधीच साहेबांबरोबर कोणत्याही परदेश दौऱ्यावर गेलेल्या नाहीत .


All Jewelry 75% OFF

सायंकाळचा बाजारहाट वगळता त्या फारशा बाहेर पडत नसत. दोघांना परस्परांबद्दल नितांत आदर होता. यशवंतराव चव्हाण हे दिल्लीमहाराष्ट्राचे वैभव स्थान होते

तर वेणूताई महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतीक होत्या.वेणूताईंच्या डोक्यावरचा पदर कधी घसरला नाही. मंत्र्यांची पत्नी कशी असावी ,

तिचा पेहराव वागणूक कशी असावी याचा त्या आदर्श होत्या. दिल्लीतील वेणूताईंचे विश्व म्हणजे साहेब आणि साहेब नसताना

त्यांच्या घरातील कामाच्या बायका एवढेच त्यांचे विश्व. साहेबांना हवी असलेली पुस्तकं, सकाळी त्यांचे कपडे ,ऑफिसची बॅग तयार करून


All Jewelry 75% OFF

आठवणीने त्यांचे औषध ठेवणार ही सर्व कामे वेणूताई स्वतः करीत .

राजकारण हे यशवंतरावांच्या रक्तात भिनले होते. राजकारणात चढ उतार होत असतात. हे यशवंतरावांच्या बाबतीतही घडले.

त्यावेळी त्यांच्या पाठीशी त्यांची पत्नी वेणूताई या खंबीरपणे उभे राहायाच्या. यशवंतरांवाना इंदिरा गांधी यांनी अचानक रित्या अर्थमंत्री करण्याचा निर्णय सांगितला.

त्यावेळी ते थोडे चलबिचल झाले. परंतु वेणूताईंनी त्यांना सावरले. त्यांनी वेणूताईंशी चर्चा करुन मार्ग काढला. खरंतर पुर्वीच्या काळी

आपल्या सहचरणीच्या कानावर गोष्ट घालून तिचे विचार जाणून घेण्याची पद्धत असायची. त्यानूसारच यशवंतरावांच्या वैवाहिक जीवनात

ती एक प्रथाच बनली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यशवंतरावंचे कौटुंबिक जीवन सुखी होते. याचे प्रमुख कारण म्हणजे पती-पत्नीमधील समजूतदारपणा हे होते.

दोघांमध्ये अबोला,नाराजीसारखे सर्वसाधारण संसारात घडतात तसे प्रकार कधीही पाहायला मिळाले नाहीत. असे राम खांडेकर


All Jewelry 75% OFF

यांनी त्यांच्या एका लेखात देखील नमूद केले आहे. खांडेकर लिहितात यशवंतरावांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीत वेणूताईंचा मोठा वाटा होता.

अतिशयोक्ती नाही, परंतु यशवंतराव वजा वेणूताई म्हणजे शून्य असेच उभयतांचे वर्तन, स्वभाव आणि नाते होते. दिल्लीत राजकारण्यांचा..

खासकरून सत्ताधीशांचा असा संसार मी तरी पाहिलेला नाही. वेणूताईंचे वागणे-बोलणे कर्मयोग्यासारखे होते. त्यांना कसलाही मोह नव्हता.

सहकारमंत्र्यांनी धाडस दाखवावे; पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे तरी ऐकावे विवाह झाल्यानंतर चव्हाण कुटुंबाच्या घराच्या उंबरठयावर ठेवलेले


All Jewelry 75% OFF

माप ओलांडून वेणूताईंनी घरात प्रवेश केला आणि लवकरच त्यात त्या समरसही झाल्या. यशवंतरावांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

परिणामी कुटुंबास हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यातच वेणूताईंचे दोन मोठे दीर गेले. त्यामुळे संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी

यशवंतराव-वेणूताईंच्या खांद्यावर पडली. ऐन तारुण्यात तुटपुंज्या उत्पन्नात मोठया कुटुंबाचा संसार वेणूताईंनी हालअपेष्टांची पर्वा न


All Jewelry 75% OFF

करता सुखाने व आनंदाने करण्यास प्रारंभ केला. तिकडे मुंबईत यशवंतरावांना काळजी पडत असे वेणूताई हे सर्व कसे सांभाळत असतील.

या काळजीतून ते वेणूताईंना पत्र लिहित असतं. या पत्रात सूचनांबरोबरच आपलं कोण परकं कोण याची जाणिव ते त्यांना करुन देत.

आपल्याकडे पैसे नाहीत म्हटल्यावर कोणाकडून उधार घ्यायचं, असे ते वेणूताईंना सांगत. कोणतीही तक्रार न करता वेणूताईंनी

यशवंतरावांना संसारात साथ दिली. दिल्लीत गेल्यानंतर वेणूताईचे जीवन केवळ यशवंतराव आणि तेथील शिपायांच्या बायका एवढंच होतं.

वेणूताईंच्या निधनानं ते पुरते खचले होते. त्यातून ते सावरू शकले नाहीत. वेणूताई. यशवंतरावांनी ‘कृष्णाकाठ’ या आपल्या चरित्र ग्रंथाची


All Jewelry 75% OFF

अर्पणपत्रिका वेणूताई यांच्या स्मृतीस अर्पण करताना पुढील भावपूर्ण शब्द वापरलेले आहेत. ”आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्‍नी.”

एकदा परदेश दौऱ्यासाठी साहेब जाण्याची तयारी करत असताना वेणूताई यांनी त्यांच्यासोबत परदेश दौऱ्यावर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली .चव्हाण साहेबांनी

स्वतःचे खासगी सचिवांना त्यांच्या खात्यावर किती पैसे आहेत याची चौकशी करण्यास सांगितले सचिवांनी खात्यावर पुरेसे पैसे नसल्याचे सांगितले .चव्हाण साहेबांनी

आपली पैशाची अडचण वेणूताईंना सांगितली व परत कधीतरी परदेशात घेऊन जाण्याचे आश्वासन दिले व चव्हाण साहेब परदेश दौऱ्यावर निघून गेले.

चव्हाण साहेब ज्या देशात जात तिथून वेणूताईंना पत्र लिहीत नेहमी प्रमाणे या परदेश दौर्यावरून ही साहेबांनी वेणूताईंना पत्र लिहिले,


All Jewelry 75% OFF

व साहेबांनी त्यात लिहीले.”प्रिय वेणु, तुझी इच्छा असूनही मी तुला आर्थिक परिस्थितीमुळे परदेशात माझ्या सोबत घेऊन येऊ शकलो नाही .

याचा काटा माझ्या मनाला आयुष्यभर टोचत राहिल.पण मला तु समजुन घेशील हा मला विश्वास आहे ” आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब केंद्रीय मंत्री होते .

सरकारी खर्चात आपल्या पत्नीचे परदेश प्रवासाचे तिकीट काढणे त्यांना सहज शक्य होते, परंतु ही माणसंच काही वेगळी होती .आता होतील का असे मुख्यमंत्री आणि त्यांच्या अशा पत्नी.

२ जुन १९४२ सालके सवाष्णीचा साजशृंगार करून वेणूताई यांनी चव्हाण यांच्या karad घरात प्रवेश केला होता


All Jewelry 75% OFF

आणि बरोबर दोन जून १९८३ रोजी उंबरठा ओलांडून त्या दूरच्या प्रवासाला निघून गेल्या फरक एवढाच होता की

यावेळी प्रथम असत्या साहेबांच्या मागे चालण्याची प्रथा मोडून त्यापुढे आणि यशवंतराव साहेब मागे राहिले .

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय वेणूताई चव्हाण यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

 

 


All Jewelry 75% OFF

Advertisement

More Stories
Gopal Ganesh Agarkar
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
error: Content is protected !!
%d bloggers like this: