Mosaad
Mosaad
Mosaad

Mosaad – आज पर्यंत अशी कामगिरी कोणत्याही देशाच्या गुप्तहेराला जमली नाही.

Mosaad - गुप्तहेरांचा शिरोमणी - ऐली कोहेन

Mosaad – आज पर्यंत अशी कामगिरी कोणत्याही देशाच्या गुप्तहेराला जमली नाही.

 

Mosaad – गुप्तहेरांचा शिरोमणी – ऐली कोहेन

 

1/6/2021,


सध्या इस्त्रायल आणि हमास यांच्यात जो संघर्ष सुरु आह. त्या पार्श्वभूमीवर मी शाळेत असताना एक लेख वाचला होता. त्यातील सर्व तपशील

आज आठवत नाहीत पण ऐली कोहेनची कामगिरी ठळकपणे आठवत आहे. हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने काही पुस्तके यावर वाचायला मिळाली.

मला ऐलीची एक हेर म्हणून कामगिरी समजली ती येथे देत आहे.


इतिहास म्हटला की कुठल्याही महाराष्ट्रीय माणसाला पहिले आठवतात शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा सर्वात प्रसिद्ध हेर होता बहिर्जी नाईक.

आज बहिर्जीच्या कामगिरीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण इस्त्रायलच्या या बहिर्जीबद्दल आज भरपूर माहिती देणारे साहित्य उपलब्ध आहे.

प्रत्येक देशाची एक हेरसंस्था असते. हिंदुस्थानची आहे RAW. अमेरिकेची आहे CIA. पाकिस्ताहची आहे ISI तशी इस्रायलची आहे Mosaad.


इस्रायलचा जन्म हा १९४८ साली झाला. या देशाच्या सर्व बाजूनी जे देश आहेत ते अरब वंशाच्या मुस्लिम लोकांचे आहेत.

इस्त्रायल आणि शेजारील देश सीरिया, लेबेनॉन, इजिप्त आणि जॉर्डन या देशांशी सीमेवरून कायम वाद राहिला आहे.

त्यामुळे मोसाद ही सर्वात जास्त सतर्क असलेली संस्था आहे.

अनेक शतके ज्यू लोकांना आपला देश नव्हता. पण १९४८ साली पॅलेस्टाईनची भूमी तोडून इस्रायलची स्थापना झाली.


त्यामुळे जगभर विखुरलेले अनेक ज्यू इस्त्रायल स्थलांतरित झाले. आपल्या हिंदुस्थानात खासकरून महाराष्टात अनेक ज्यू होते आणि काही प्रमाणात आजही आहेत.

ते जरी प्रार्थना ज्यू धर्मानुसार करत असले तरी मराठी भाषेबद्दल जाज्वल्य सभिमान बाळगून आहेत.

ऐलीचे आई वडील हे ईजिप्तमधील अलेक्झांड्रिया या शहरात राहत होते. ऐलीचे वडील ज्यू होते तर आई ही सीरियातील एक अरब स्त्री होती.

इस्रायलची स्थापना झाल्यावर ऐलीचे आईवडील आणि भावंडे ही इस्त्रायल स्थलांतरित झाली. पण एली इजिप्त मध्येच राहिला.


ऐली एक हुशार विद्यार्थी होता. त्याला अनेक भाषा येत असत. तसेच अरबी ही तर मातृभाषा होती. पण इराक मधील अरबी, सीरियातील अरबी,

ईजिप्तमधील अरबी आणि सौदीतील अरबी यात थोडा फरक आहे. जसा मराठी भाषेत कोकणात मराठी भाषेचा लहेजा वेगळा

आहे तसाच विदर्भात तो वेगळा आहे. ऐलीला सर्व ढंगाच्या अरबी भाषा येत होती. तसेच त्याने अलेक्झांड्रिया विद्यापीठातुन इलेक्ट्रोनिक्सची पदवी मिळवली.

१९५७ साली ऐली इस्त्रायल स्थलांतरित झाला.. सुरुवातील त्याने इलेक्ट्रोनिक्सच्या क्षेत्रात काम केले पण दोन वर्षांनंतर त्याकामात त्याचे मन रमेनासे झाले..


आपल्या पितृभुमीकरता काही तरी करावे असे वाटत असे. १९५९ साली त्याने मोसादशी संपर्क साधला. मोसादच्या अधिकाऱ्यांनी

त्याचे शिक्षण आणि व्यक्तिमत्व पारखले. त्यांना तीन गोष्टी आवडल्या एक पितृभूमीबद्दल असलेला जाज्वल्य अभिमान दोन तीक्ष्ण बुद्धी

आणि तिसरा अनेक भाषांवरील त्याची असलेले प्रभत्व या गोष्टी एक हेर होण्यासाठी आदर्श होत्या. मोसादने त्याला हेरगिरीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

दोन वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर तो हेरगिरीकरता तयार झाला होता.


मोसादने त्याला सिरीयात पाठवण्याचे ठरवले. कारण आज ना उद्या सीरियाशी युद्ध होणार याची कल्पना इस्त्रायल च्या राज्यकार्याना आली होती.

त्यामुळे १९६१ साली ऎलीची रवानगी सिरीयात केली. पण त्याला लगेच सिरीयात पाठवले नाही.

त्याला प्रथम अर्जेंटिनाची राजधानी बुंयोस आयर्स येथे पाठवले. तेथे त्याची प्रतिमा एक धनवान अरब कापड आणि फर्निचरचा व्यापारी म्हणून उभी केली.

त्याचे नाव बदलून कामेल असे केले. ऐलीने सीरियन दूतावासात हळूहळू आपल्या ओळखी वाढवल्या. प्रथम दूतावासातील आणि

अधिकारयांना लागणारे कपडे आणि फर्निचर देण्यास सुरुवात केली. लवकरच तो तेथील अधिकाऱ्यांना हॉटेल्समधून पार्टी देत असे.

महाग भेटवस्तू देत असे. मंदिरा आणि मदिराक्षी यांची काळजी घेत असे. त्यामुळे तेथील छोट्या अधिकाऱ्यांपासून राजदूता पर्यंत त्याचे सर्व मित्र झाले.

तेथे एक अधिकारी होते त्यांचे नाव होते अमीन-अल-हफीझ (जे पुढे जाऊन सीरियाचे राष्ट्रपती झाले). सिरीयात अनेक लोक तत्कालीन राजवटीबद्दल खुश नव्हते.

अमीन यांनी सिरीयात परत जाऊन बंडखोरी केली तत्कालीन अस्तित्वात असलेले राष्ट्रपतींना पदच्युत केले आणि स्वतः राष्ट्रपती झाले.

जाण्यापूर्वी त्यांनी ऐलीला त्याच्या मातृभूमीत सिरीयात येण्यासाठी विनवले आणि त्याचा व्यवसाय तेथे जम बसण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

ऐलीला आणि मोसाद्ला हेच हवे होते.

अमीन यांच्या पाठोपाठ तो सिरीयात आला. लवकरच त्याचा व्यवसायाचा जम बसला. त्याने सरकारमध्ये सर्व मंत्रालयात आपले मित्र केले.

खासकरून संरक्षण मंत्रालयात कोणी शिंकला तरी त्याला सर्व माहिती मिळत असे त्याने आपले जाळे विणले होते.

ऐलीची आई सीरियन होती त्यामुळे ऐली सिरीयात तो परका कधीच वाटलं नाही. सीरियाच्या राष्ट्रपती मित्र असल्याने

कोणीही ऐलीचे वडील कोण होते याचा शोध पण घेतला नाही.

स्वभाव गोडबोल्या होता. तसेच अनेक स्त्रियांना वंश करण्याची कला त्याच्यात उपजत होती. अल्पावधीत त्याने १७ मैत्रिणी आपल्याजवळ गोळा केल्या.


अनेक मंत्री आणि अधिकारी त्याच्या जाळ्यात अडकले पण काही अधिकारी आणि मंत्री त्याच्या जाळ्यात अडकले नाहीत.

अश्या मंत्री आणि अधिकारी मंडळींकरता आपल्या मैत्रिणींचा (honeytrap) उपयोग करून घेऊन त्याने जाळे विणले.

सर्व मंडळीत ऐली हा लोकप्रिय झाला. राष्ट्रपती अमीन पण त्याचा उल्लेख सीरियाचा भावी राष्ट्रपती असा करत असत.

लष्करातील अनेक अधिकारी अनेक गोष्टी ऐलीच्या समोर बोलत असत कारण राष्ट्रपती मित्र असल्याने ऐली त्यांचाच माणूस झाला होता.

मिळणारी सर्व माहिती त्याने तत्परतेने मोसाद्ला कळवत असे. त्यामुळे एलीच्या कामगिरीबद्दल Mosaad मोसादच्या अधिकारी खुश होते.


१९६४ च्या मध्यास ऐलीला एक विशेष कामगिरी देण्यात आली. इस्त्रायल आणि सीरियन सीमेजवळ एक प्रांत आहे गोलन हाईट्स.

क्षेत्रफळाने तसा छोटा प्रांत आहे. तेथील सीरियन सैन्यातर्फे काय मोर्चे बांधणी आहे याची संपूर्ण माहिती काढण्यास सांगितले.

गोलन हाईट्स येथे तैनात असलेल्या सर्व अधिक्रयशी त्याने संपर्क साधला. ज्याप्रदेशात सैन्यातील अधिकारी सोडून इतरांना मज्जाव

असलेल्या ठिकाणी ऐली गेला त्याने छुप्या कॅमेराने सर्व माहिती चित्रित केली. गोळा केलेलेही सर्व माहिती त्याने मोसादच्या सुपूर्द केली.

पण त्याकाळात ऐलीने एक चूक केली. त्याने विणलेले जाळे हे पक्कं असल्यामुळे नकळत तो थोडासा बेसावध झाला.

त्याला वाटले आपण कधीच पकडले जाणार नाही. हीच चूक त्याच्या नाशास कारणीभूत झाली.


१९६५ च्या सुरुवातील सीरियन अधिकाऱ्यांना संशय आला की आपली सर्व माहिती कुणीतरी इस्त्रायलला पुरवत आहे.

हा संशय यायला हिंदुस्थानची दूतावास कारणीभूत ठरली. कारण सर्व दूतावासातील अधिकारी आपल्या सरकारला माहिती रेडिओ ट्रान्समीटरने पुरवत असतात.

ऐलीचा जवळ राहणाऱ्या हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना जेव्हा ऐलीच्या ट्रान्समीटरचा त्रास झाला तेव्हा त्यांनी सीरियन अधिकाऱ्यांना जागे केले.

त्यांनी गुप्तपणे याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. त्याकाळात रशिया आणि सीरियाचे संबंध मधुर होते.

त्यामुळे संरक्षण मंत्रालय आणि सैन्यप्रमुख यांनी रशियाची मदत घेण्याचे ठरवले. रशियाकडे रेडिओ ट्रान्समीटर शोधण्याचे यंत्र होते

आणि सीरियाकडे ते तेव्हा नव्हते.. ऐली आपली सर्व माहिती हा रेडिओ ट्रान्समीटरने मोसादकडे पाठवत असे. एलीच्या ओळखी जरी

असल्या तरी रशियाचा मदत घेण्याची गोष्ट फक्त तीन लोकांना माहित होती राष्ट्रपती, सैन्यप्रमुख आणि संरक्षण मंत्री त्यामुळे बाहेर कुठे फुटली नाही.

रेडिओ ट्रान्समीटर शोधायचा सीरियन सरकारचा प्रयत्ना ऐलीला माहित झाला नाही.


जेव्हा रशियन अधिकाऱ्यांनी आपले शोधयंत्र आणले आणि कोण माहिती सीरियाच्या बाहेर पाठवत आहे याची माहिती गोळा केली.

त्यात त्यांना ऐलीच्या घरात रेडिओ ट्रान्समीटर असल्याची माहिती मिळाली. ऐलीने पाठवले संदेश रशियन यंत्राने मिळवले.

ऐलीच्या घरी धाड पडली त्यात रेडिओ ट्रान्समीटर मिळाला. सरकार आणि सैन्यातील अनेक अधिकाऱ्यांचा पटकन विश्वासच बसला नाही.

रशियन अधिकाऱ्यांनी आपल्या गुप्तहेर संस्थेतर्फे ऐलीची सर्व कामगिरीची माहिती सीरियन सरकारला दिली.


ऐली कसा अर्जेन्टिनामधून त्यांच्या देशात आला. ऐलीचे बहुतेक मित्र दंग झाले. ऐली हा मोसादच्या गुप्तहेर आहे यावर अनेकांनी पटकन विश्वास ठेवला नाही.

तत्कालीन नियमांनुसार ऐलीला फाशीची शिक्षा झाली आणि त्याला भर चौकात फासावर लटकवले.

१९६७ साली जेव्हा इस्त्रायल आणि सीरिया यांच्यात युद्ध झाले तेव्हा इस्त्रायलने गोलन हाईट्स वर कब्जा मिळवला.

ऐलीने दिलेल्या माहितीच्या आधारावर इस्त्रायलच्या सैन्याने मोर्चे बांधणी केली. एलीच्या माहितीमुळे ते १००% यशस्वी झाले. ऐलीने दिलेल्या माहितीत १% पण चूक सापडली नाही. .

मोसाद Mosaad ऐलीला गुप्तहेरांचा शिरोमणी, कारण त्याच्या इतकी अव्वल कामगिरी तोपर्यंत कोणत्याही हेराने केलेली नव्हती. 

शैलेश दामले

संदर्भ
१. जगभरची भयानक कामगिरी – द पा खांबेटे
२. Mosaad – Israel’s Most Secret Service by Ronald Payne

Advertisement

More Stories
peshwa empire
Peshwa Empire – पेशवाईतील स्त्रिया भाग – ७
error: Content is protected !!
%d bloggers like this: