p l Deshpande पु.ल.
p l Deshpande पु.ल.
p l Deshpande पु.ल.

p l Deshpande – नाटककार, पु. ल. दशावतारी व्यक्तिमत्व

p l Deshpande - व्यक्तिमत्व,नाटककार,दिग्दर्शक,निर्माते,संगीतकार,वादक,विनोदीलेखक,वक्ता,कवी,शिक्षक

p l Deshpande – नाटककार पु. ल. दशावतारी व्यक्तिमत्व

p l Deshpande – व्यक्तिमत्व,नाटककार,दिग्दर्शक,निर्माते,संगीतकार,वादक,विनोदीलेखक,वक्ता,कवी,शिक्षक

 

 

24/8/2021,

व्यक्तिमत्व,नाटककार,दिग्दर्शक,निर्माते,संगीतकार,वादक,विनोदीलेखक,वक्ता,कवी,शिक्षक असे दशावतारी व्यक्तिमत्वाचे अर्थात आज पु ल देशपांडे

यांची जयंती (जन्म ८-११-१९१९ ) पु. ल हे एक अजब रसायन होऊन गेले.त्यावर आपण भाष्य करणे अशक्य आहे.प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ‘पु ल ‘ आहेतच.

पु ल ‘चे लहानपणापासूनचे जीवन. पु.ल.देशपांडे यांचे वडील हे ’अडवाणी कागद कंपनी‘त दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना

जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही.

अशा तत्त्वनिष्ठ आणि सज्जन घरात पु.ल. जन्मले. पु.ल.देशपांडे p l Deshpande लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत.

मात्र ते अतोनात हुशार होते. सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे पैसे त्यांच्या नशिबात नसत.

आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत

आवाजात म्हणून दाखवले. अशी भाषणे सात वर्षे चालली.

त्यानंतर मात्र, वयाच्या बाराव्या वर्षापासून पु.ल.देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले, इतकेच नव्हे तर इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.

आपल्या घरात पु.ल.देशपांडे यांना खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. शिवाय त्यांच्या घरी संगीताच्या बैठका होत असत. ते घरीच

बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी व भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच

बरा असे आईला वाटे. पु.ल.देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे.

यातूनच पु.ल. p l Deshpande खाण्याचे शौकीन झाले. वडिलांच्या मृत्यूमुळे पु.ल.देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत

असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या ’माझिया माहेरा जा‘ या कवितेला चाल लावली.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

आज ते गाणे मराठी भावसंगीतातला अनमोल ठेवा आहे. ग.दि.माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या ’इंद्रायणी काठी‘ला पु.लं.नी चाल लावली होती.

हेही गाणे अजरामर झाले. कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत.

मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल., मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व

सरकारी लॉ कॉलेजमधून एल्‌एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग

ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले. १९३७ पासून

पुलंचा नभोवाणी संबंध आलाच होता. आता १९५५ मध्ये पु.ल.देशपांडे p l Deshpande ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी

त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७ मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी

’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. १९५८ मध्ये पुलंना

आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९ मध्ये पु.ल.देशपांडे भारतातील

पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिर्जू महाराजांच्या

नृत्याचा कार्यक्रम होता. संथगतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अशा वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.

पु ल  यांची अनेक भाषणे ऐकण्याचा योग्य आला हेच आमचे नशीब. सूक्ष्म निरीक्षण व त्याचे खुसखुशीत वर्णन, हजरजबाबी पणा हे त्यांचे वैशिष्ट्य.

त्यांची साहित्य संपदा थोडक्यात नाटके तुका म्हणे आता पुढारी पाहिजॆ अंमलदार भाग्यवान तुझें आहे तुजपाशीं सुंदर मी होणार पहिला राजा/आधे अधूरे

तीन पैशांचा तमाशा ती फुलराणीएक झुंज वार्‍याशी लहान मुलाची नाटके वयं मोठं खोटं नवे गोकुळ खोगीरभरती खिल्ली कोट्याधीश p l Deshpande पु. ल.

टेलिफोनचा जन्म पोरवय विनोदी पुस्तके नस्ती उठाठेव बटाट्याची चाळ गोळाबेरीज असा मी असामी ह(फ)सवणूक उरलं सुरलं

पुरचुंडी वटवट वटवट मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास अघळपघळ.

Team Postbox india
postboxindia.com
www.postboxindia.com

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Doctors Day
Doctors Day राष्ट्रीय डॉक्टर दिन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डॉक्टरांना संदेश
error: Content is protected !!
%d bloggers like this: