Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

pure science – भोंदू विज्ञान

1 Mins read

pure science – भोंदू विज्ञान

pure science – देवी महात्म्याची ! मातेच्या पाॅवरची

 

 

11/10/2021,

नवरात्रीच्या काळात एक पोस्ट फिरते आहे.. देवी महात्म्याची ! मातेच्या पाॅवरची.
भोंदू विज्ञान त्यातून सिद्ध होत आहे !!
या पोस्टमध्ये विज्ञानाचा हवाला देऊन हिंदू धर्मातील आदिशक्ती ही pure science विज्ञाना अगोदर कशी अस्तित्वात होती असे सांगण्याचा भंपकपणा केला आहे.
पोस्ट अशी आहे –
” आपणास आईकडून ५०% व बाबांकडून ५०% जनुके मिळतात. जनुकांचे दोन प्रकार असतात.
आण्विक जनुके आणि तंतूकणिका जनुके.
( Molecular DNA व Mitochondrial DNA).
यापैकी तंतूकणिका जनुके ही फक्त आईकडून मुलांमध्ये येतात. तंतूकणिकेमध्ये ऊर्जा साठवलेली असते. म्हणजेच आपल्याला ऊर्जा ही आईकडून मिळते. म्हणजेच ती आदिशक्ती होय. म्हणजेच पुरुषांना सुद्धा स्त्रीच ऊर्जा देते आणि हिंदू धर्मात तीच आदिशक्ती किंवा मा शक्ती आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांना वैज्ञानिक सत्य लाखो वर्षापूर्वी माहिती होते. आणि सर्व वैदिक पूजा आणि यज्ञ हे माता दुर्गाच्या मंत्रांनी भारलेले गुप्त पातळीवरचे ऊर्जा स्त्रोत होतं. आणि तेच आपल्याला शक्ती देतात.”
या पोस्टमध्ये भोंदूगिरी खचाखच भरलेली आहे.
इथे आदिशक्तीची उर्जा म्हणजेच शरीरातील तंतूकणिका किंवा मायटोकाँड्रियल असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. फिलिप सिकविट्झ नावाच्या अमेरिकन पेशी जीवशास्त्रज्ञाने मायटोकाँड्रियात उर्जा साठवली जाते हे शोधून काढले. कुठल्या वैदिक ग्रंथाने नव्हे. फिलिप स्वतः pure science विज्ञानात नैतिकता असावी याचा पुरस्कार करायचा. इथे धार्मिकांनी विज्ञानाचा वाट्टेल तसा वापर सुरू ठेवलाय.
जर स्त्रियांच्या शरीरातून ऊर्जेची जनुके स्त्री व पुरुषांना मिळत असतील तर ते फायदा आणि नुकसान दोन्ही करतात. म्हणजेच शरीरात ऊर्जा निर्माण झाल्यानंतर ती साठवली जाते तंतूकणिकेमध्ये, पण ही ऊर्जा आदिशक्ती किंवा महाशक्ती निर्माण करत नाही. ती प्रथिने, कर्बोदके व चरबी या अन्नघटकातून मिळते. त्यासाठी आपणास ऑक्सिजन शरीरामध्ये ओढून घ्यावा लागतो आणि शरीरातील पेशींमध्ये असंख्य रासायनिक क्रिया घडतात. तेव्हा कुठे एनर्जी निर्माण होते आणि ती तंतुकणिकेत साठविली जाते. आरती-कर्मकांडे केल्यावर उर्जा निर्माण होत नाही. जसे की थाळ्या बडवून कोरोना पळून जात नाही.
मुलं निर्माण होते वेळी या तंतूकणिका मुलांमध्ये स्त्रियांकडून शरीरात जातात, पुरुषांकडून जात नाहीत असे पोस्टकर्त्याचे म्हणणे खोटे आहे. अलीकडच्या संशोधनातून पुरुषांकडून सुद्धा तंतुकणिकाची जनुके मुलांमध्ये जातात असे आढळले आहे. बहुसंख्य प्रमाणात स्त्रियांकडून जातात व पुरुषांकडून कमी प्रमाणात जातात, यास एम. टी. डी. एन. ए. हेटेरोप्लाजमी असे म्हणतात.
दुसरा मुद्दा असा आहे की स्त्रीकडून मुलांमध्ये जेव्हा तंतुकणिकेची जनुके जातात तेव्हा उर्जेची ताकद देण्याबरोबर “रोगाची” ताकद सुद्धा दिली जाते. म्हणजे ज्या स्त्रियांमध्ये या जनुकांमध्ये रोग आढळतात ते सर्व रोग मुलांमध्ये निर्माण होतात व ती मुले कशीबशी पंधरा-वीस वर्षे जगतात.
इथे आदिशक्तीमुळे मुलांना रोग होतात असे हिंदू विज्ञाना प्रमाणे म्हणायला हवे..!
हे जे रोग आहेत ते म्हणजे डोळ्याची पापणी अधू होणे, शरीराचे स्नायू बाद होणे, हृदयाचे स्नायू रोगग्रस्त होणे, बहिरेपणा, आंधळेपणा आणि मधुमेह.
जर हे सारे रोग आदिशक्ती देत असेल तर ती थोरच म्हणायला हवी.
आईकडून हे रोग मुलांमध्ये गेलेल्या पैकी १४ टक्के मुले हे जास्तीत जास्त नऊ वर्षे जगले. म्हणजे आदिशक्ती जास्त दिवस जगू पण देत नाही.
मॅथ्यू स्टेपनेक नावाचा लहान मुलगा कवी होता. शिवाय त्याने जागतिक शांततेसाठी कार्य ही केले आहे. तो वयाच्या तेराव्या वर्षी तंतुकणिकेच्या रोगामुळे गेला. अमेरिकेत वर्षात या रोगामुळे सुमारे चार हजार मुले बळी गेलीत. लेघ सिंड्रोम आणि मेला सिंड्रोम असे दोन घातक रोग याच तंतुकणिकेतील दोषामुळे मुळे होतात.
आता यासाठी आदिशक्तीचे कोणते तंत्र-मंत्र-कुंडलिनी-योग उपाय म्हणून वापरता येतील ते हिंदू विज्ञानाने जाहीरच करावे.
आणि आदिशक्ती तमाम लोकांमध्ये किती ज्यूल वा किलोकॅलरी ऊर्जा रोज निर्माण करते तेही सांगूनच टाकावे !
सामान्यपणे अशी भ्रामक समजूत आहे की आदिशक्ती, देवी-देवता या गावांचे संरक्षण करतात. पापी लोकांना शिक्षा देतात आणि सर्व रोग नाहीसे करतात. हिंदू विज्ञानाने सांगितलेल्या तंतुकणिकेच्या आदिशक्तीच्या रोगासाठी उपाय सांगितला तर बरे होईल.
पेशींमध्ये सायटोप्लाझम, रायबोसोम्स, न्युक्लिअस, गाॅल्गी बाॅडी, असे अनेक घटक असतात. त्यांचेही बारसे हिंदू विज्ञानाने होऊन जाऊदे. प्रत्येक देव-देव्यांचे अर्थ पेशींच्या या घटकात लावण्याची भोंदुगिरी चालू राहू दे.
..खरेतर देव आणि धर्म यांचा संबंध pure science विज्ञानाशी जोडून विज्ञानाच्या आधारे आम्ही कसे थोर होतो असे सांगणे म्हणजे मोठी भोंदूगिरी आहे.
देवीचे महात्म्य सांगण्याचा काळ आला की या देशातील धार्मिक लोक रोज होणारे ७७ बलात्कार विसरतात !! त्यावेळी आदिशक्तीच्या मायटोकाँड्रिया गायब होतात.
आई-बहिणीवरून शिव्या देण्याचे चालूच ठेवतात..
आणि दांभिकपणे देवीची पूजा करून आपण स्त्री रक्षक आहोत असे नाटक करतात.
यातून ना धड पुरुषत्व संपते ना स्त्रीत्वाला कळते की आपण शोषणाच्या गटातले शोषित आहोत. धर्माच्या नावाखाली आता विज्ञानलाही ओढणार्या या ढोंगीपणाला धार्मिक म्हणत असावेत बहुधा!

Also Visit : https://www.postboxlive.com

-डाॅ. प्रदीप पाटील

Leave a Reply

error: Content is protected !!