R R Patil aaba
R R Patil aaba
R R Patil aaba

R R Patil aaba – रोहित, आबाची नक्कल नको अक्कल वापरा !

R R Patil aaba - रोहित पाटील

R R Patil aaba – रोहित, आबाची नक्कल नको अक्कल वापरा !

 

R R Patil aaba – रोहित पाटील

 

 

दत्तकुमार खंडागळे

रोहित पाटलांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमोल कदम यांनी लोकमतला स्टेटमेंट दिले होते.

सदरचे स्टेटमेंट सडेतोड न्युज चँनेलचे संपादक विक्रांत पाटील यांनी द्यायला लावले असे म्हणत विक्रांत

पाटलांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. “तुमच्यात दम असेल तर संजय पाटलांच्या विरोधात लिहा !”

वगैरे सल्ले त्यांच्या कार्यकर्त्यांनी विक्रांत पाटील यांना दिले आहेत. तसेच स्वत: रोहित पाटील यांनीही विक्रांत

यांना पत्रकारिता कशी करायला हवी याचे मार्गदर्शन अतिशय नम्रपणे केले म्हणे. रोहित पाटील माजी उपमुख्यमंत्री

व R R Patil aaba गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव आहेत. ते सेम टू सेम आर आर पाटलांसारखेच बोलतात.

त्यांची हूबेहूब नक्कल करतात. R R Patil aaba आर आर पाटील हे त्यांचे जन्मदातेच आहेत त्यामुळे ते साहजिक आहे.

त्यांची छाप त्यांच्यावर असणारच यात शंंका नाही पण रोहित पाटलांनी केवळ नक्कल करण्यापेक्षा

आंबाची अक्कल वापरायला हवी. आर आर पाटील हे नेतृत्व केवळ तासगाव तालुक्याने नव्हे तर राज्याने

स्विकारलेले होते. रोहित पाटलांना आर आर पाटलांचा वारसा आहे पण आर आर यांना कुणाचाच वारसा नव्हता.

ते स्वबळावर राजकारणात आले. तत्कालीन आमदार कै. दिनकर पाटील यांच्याशी संघर्ष करत ते आमदार झाले.

त्यानंतर दिनकर पाटील यांचे पुतणे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या सोबतही त्यांचा पराकोटीचा संघर्ष

राज्यभर गाजला. या संघर्षात संजय पाटलांनी एकदा R R Patil aaba आर आर पाटील यांना मारहाणही केली होती. ते आमदार होण्यापुर्वी त्यांंच्यावर संजय पाटलांनी हात टाकला होता. आर आर पाटील तरीही डगमगले नाहीत, घाबरले नाहीत. तालुक्यातल्या जनतेने उस्फुर्तपणे आर आर पाटील यांचे नेतृत्व स्विकारले. त्यांना निवडूण दिले. त्यानंतरच्या काळात आर आर पाटील यांनी कधीच मागे फिरून पाहिले नाही. स्व सामर्थ्यावर त्यांनी स्वत:चे राजकारण उभे केले. त्यांच्याकडे पराकोटीचा संयम होता. जीभेवर गोडवा होता तसेच विरोधात येणा-या बातम्या ते सहजपणे स्विकारत होते. विरोधात लिहीणा-या, बोलणा-या पत्रकारांचा त्यांनी कधीच राग राग केला नाही किंवा बंदोबस्त करण्याची हलकट मानसिकता ठेवली नाही. R R Patil aaba आर आर पाटील गृहमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना वज्रधारीत त्यांच्या विरोधात अनेकवेळा जळजळीत लेख लिहीले होते. त्यांनी ते अतिशय खिलाडूवृत्तीने स्विकारले. फोन करायचे, मोकळेपणाने बोलायचे, “मला माझे काय चुकतय ते सांगा !” म्हणायचे. “आपण बोलूया, मला सहकार्य करा !” म्हणायचे पण कधी कार्यकर्त्यांकरवी दांडगावा केला नाही, कधी आमचा दम तपासण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या विरोधात खुप लिहीले पण ते कधीच आम्हाला पत्रकारिता शिकवायला व मार्गदर्शनाचे कोचिंग क्लासेस घ्यायला आले नाहीत. त्यांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत केले. पत्रकारांशी खुप चांगली मैत्री असणारे नेतृत्व म्हणजे आर आर पाटील. ते जणू मिडीया डार्लिंग होते. राज्यभरातल्या पत्रकारांचे ते लाडके नेते होते.

रोहित पाटलांनी केवळ R R Patil aaba आर आर पाटलांच्या नकला करू नयेत तर त्यांचे गुण आत्मसात करावेत. त्यांच्या सारखे जमिनीवर रहावे, सामान्य माणसांशी घट्ट नाळ जोडून घ्यावी. त्यांच्या प्रश्नावर काम करावे. ते सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत. राजकारणात जसेचे तसे बोलले, भाषणं केली म्हणजे लोक स्विकारतात असे होत नाही. तसे असते तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. लोकांनी त्यांना बाळासाहेबांसारखी ताकद दिली असती पण असे घडलेले नाही. बाळासाहेबांसारखे यश राज ठाकरेंना मिळालेले नाही याचे भान रोहित पाटलांनी ठेवावे. रोहित पाटील हे राजकारणाच्या यलपंडीत आहेत. त्यांची आत्ताशी सुरूवात आहे. इतक्यात त्यांनी चमच्यांचे वर्तुळ कामाला लावू नये. राजकारणात झालेली टिका सहन करता आली पाहिजे, विरोधात आलेल्या बातम्या आणि मतं स्विकारता आली पाहिजेत. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टिकेचे रोज हजारो दगड भिरकावले जातात पण तो माणूस कधीच डगमगत नाही. त्यांनी कधीच टिकाकारांच्या टिकेला उत्तर द्यायचा प्रयत्न केला नाही. त्यांच्यावर टिका करतच अनेकांचे दुकान राजकारणात प्रस्थापित झाले. गो. रा खैरनार यांनी व अण्णा हजारेंनी पवारांच्यावर टिका करत महाराष्ट्र ढवळून काढला होता. भाजपातली अख्खी नेतावळ तेच करायची, पवारांच्यावर टिका करतच पुढे यायची. मुंडे यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यांपर्यंत अनेकांनी पवारांना तुरूंगात टाकायच्या शपथा घेतल्या, वादे केले पण पवार कधीही बिथरले नाहीत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राजकारणही असेच संयमी आहे. रोहित पाटलांनी किमान आपल्या वडीलांचा, आपल्या पक्षाच्या जेष्ठ नेत्यांचा कित्ता गिरवायला हवा. तासगाव-कवठेमहंकाळ मतदारसंघात लोकांच्यात जावून खुप काम करायला हवे. लोकांच्या प्रश्नावर बोलायला हवे, झगडायला हवे. महेश खराडे तासगाव कारखान्याच्या प्रश्नावर भांडत आहेत. लोकांच्या ऊस बिलासाठी संघर्ष करत आहेत पण रोहित पाटलांनी आजवर या ज्वलंत प्रश्नावर साधा ब्र शब्दही काढलेला नाही. तासगाव नगर पालिकेतील सत्ताधा-यांच्या भानगडीवरही कधी तोंड उघडलेले नाही. मतदारसंघात सामाजिक कामांची उभारणी केलेली नाही. रोहित यांचे कार्यकर्ते विक्रांत पाटील यांना “तुमच्यात दम असेल तर खासदारांच्या विरोधात लिहा !” असे बोलत आहेत. याच न्यायाने विचार केला तर रोहितही खासदारांच्या विरोधात बोलत नाहीत मग इथेही दमाची भाषा बोलायची का ? रोहित यांच्यात दम नाही म्हणायचे का ?

केवळ लोकांच्यात फिरून, लोकांचे पाय धरून सहानुभूती मिळवत फार काळ राजकारण साधणार नाही. पुर्वजांची पुण्याई कामाला यायचे दिवस संपले आहेत. आजच पुण्याई कमवायची आणि आजच खर्च करायची असा काळ आहे. पुर्वजांच्या पुण्याईवर जगता येत असते तर वसंतदादांचे नातू प्रतिक पाटील राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. आज त्यांना खासदार म्हणून निवडूण येणेही मुष्किल झाले आहे. या सगळ्यांचा विचार करून रोहित यांनी पुढे जायला हवे. त्यांचे उज्वल भविष्य त्यांची वाट पहाते आहे. त्यांच्या अवतीभोवती लोणी घेवून वावरणारी मंडळी आहे त्यांना त्यांनी मापात ठेवावे. त्यांनी पत्रकारांचे दम पाहण्यापेक्षा तालुक्यातील व तासगाव नगर पालिकेतील विविध प्रश्नावर भांडावे, रस्त्यावर यावे, लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि आपल्यात किती दम आहे ? ते लोकांना दाखवून द्यावे. पत्रकारांचा दम बघून त्यांचा काय उपयोग होणार आहे ? पत्रकारांच्या दमाची लिटमस टेस्ट घेत बसण्यापेक्षा गपगुमान स्वत:चे काम करावे. असे केले तर नेता व नेत्याचे राजकारण मोठे होईल. रोहित पाटील जेवढ्या लवकर आपल्या आजूबाजूच्या या भक्तावळीतून मोकळे होतील, स्तुती पाठकांचे थवे बाजूला सारतील, लोणी घेवून दादा दादा करत मालिशचा स्वार्थी व्यवसाय करणा-यांच्या गोतावळ्यातून मोकळे होतील तेवढ्या लवकर त्यांचे नेतृत्व लोकाभिमुख होईल. एकदा या तोंडावर स्तुती करणा-या स्तुतीपाठकांची सवय झाली, कानाला स्तुतीचे गोड गोड स्तवन ऐकायची सवय झाली, चाटूगिरी करणा-यांची फौज आजूबाजूला निर्माण झाली की चांगले आणि वाईट यातला फरक कळेनासा होतो. चुक-बरोबर यातले अंतर समजेनासे होते. मग आपण चुकलो तरी ते योग्यच आहे असे वाटू लागते. आजूबाजुची चमचावळ त्यांच्या स्वार्थासाठी लोणी चोळत राहते आणि दादा तुम्हीच बरोबर, तुमचेच योग्य, तुम्हीच ग्रेट असे म्हणत राहते आणि माणसं त्यात फसत जातात. अनेकवेळा हातून चुका होतात, चुकीच्या भूमिका घेतल्या जातात तेव्हा आपल्या चुकीला चुक म्हणून सांगणारेच सच्चे मित्र असतात, तेच खरे मार्गदर्शक असतात याचे भान ठेवायला हवे.

रोहित पाटील हूशार आहेत. त्यांना वारसाही तेवढाच तोलामोलाचा आहे. त्यांनी तो कर्तबगारीतून सिध्द केला पाहिजे. तरच राजकारणात टिकता येईल. हल्ली पुण्याई कामाला येत नाही. स्वार्थ संपला की चमचे, लोणीवाले टांग मारतात. आबा असताना तासगाव तालुक्यातले अनेकजन आबा आबा करत मागेपुढे करणारे आज खासदारांच्या दावणीला आहेत. खासदार उठायच्या आधी ते दारात जावून बसलेले दिसतात. हा काळाचा महिमा असतो. त्यामुळे रोहित यांनी सबुरीने घ्यावे. टिका झाली तरी विचलीत न होता स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. असे केले तर त्यांना कुणीही रोखू शकणार नाही.

 

 

दत्तकुमार खंडागळे

Advertisement

More Stories
Tennis Courts - Martina Navratilova and Chris Evart
Tennis courts- एक अनोखी दास्तान – समीर गायकवाड
error: Content is protected !!
%d bloggers like this: