rajaram maharaj wife name
rajaram maharaj wife name
rajaram maharaj wife name ahilyabai

rajaram maharaj wife name – अहिल्याबाई ऊर्फ अंबिकाबाई

rajaram maharaj wife name - शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या चौथ्या राणीसाहेब अहिल्याबाई ऊर्फ अंबिकाबाई

rajaram maharaj wife name –  अहिल्याबाई ऊर्फ अंबिकाबाई

 

rajaram maharaj wife name – शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या चौथ्या राणीसाहेब अहिल्याबाई ऊर्फ अंबिकाबाई

 

 

३ मार्च, छत्रपती राजाराम महाराज यांचे पुण्यस्मरण, त्यानिमित्त
मातोश्री अहिल्याबाई उर्फ अंबिकाबाई यांची सती जाणेबाबत कहाणी – ‘सतीचा प्रताप’
शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांना चार राण्या होत्या. श्रीमंत जानकीबाई, सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्या, श्रीमंत ताराऊसाहेब,सरलष्कर हंबीरराव मोहिते यांच्या कन्या,
श्रीमंत राजसबाईसाहेब, घाटगे यांच्या कन्या आणि ( rajaram maharaj wife name )  श्रीमंत अहिल्याबाई उर्फ अंबिकाबाई साहेब, सरलष्कर शहाजी नाईक निंबाळकर, वैराग यांच्या कन्या.

rajaram maharaj wife name
rajaram maharaj wife name शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या चौथ्या राणीसाहेब अहिल्याबाई ऊर्फ अंबिकाबाई या सती

छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन सिंहगडावर इ.स. १७०० साली झाले. छत्रपतींच्या राजधानीला बादशहा औरंगजेब त्यावेळी वेढा घालून बसला होता .राजधानीला बादशहा वेढा घालणार असल्याची खबर छत्रपतींना अगोदरच समजली असल्याने त्यांनी आपली राजधानी काही दिवस पन्हाळा येते, तर काही दिवस विशाळगडावर ठेवली होती . सिंहगडावर थोड्याशा आजारा नंतर छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाले. त्यावेळी सिंहगडावर रामचंद्रपंत अमात्य हजर होते . छत्रपतींच्या राण्या ताराऊसाहेब आणि राजसबाईसाहेब यावेळी पन्हाळा येथे होत्या. छत्रपतींच्या चौथ्या राणीसाहेब अहिल्याबाई उर्फ अंबिकाबाई विशाळगडावर होत्या.

rajaram maharaj wife name अंबिकाबाई यांना छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूची बातमी समजली तो तिसरा दिवस होता. अद्याप सूर्य अस्त झाला नव्हता चार सहा घटका दिवस शिल्लक होता. राजाराम महाराज यांचा काळ झाला हे ऐकून अंबिकाबाई राणीसाहेब वाड्यातून सदरेवर आल्या.. सदरेचे हवालदार सरनौबत यांनी मुजरा केला. महाराजांचे निधनाने तेही श्रमी झाले. त्यावर हा मृत्युलोक आहे तुम्ही का श्रमी होता ?‘आम्ही सहगमन करणार ‘ असे राणीसाहेब यांनी सरनौबतांना सांगितले. त्यावर सरनौबत हे महाराज असता आपण सदरेवर येत नव्हता. मनुष्य दृष्टीस पडत नव्हते. हल्ली या निमित्ते लोक पाहावेत अशी इच्छा झाल्याचे त्यांना कुबुद्धी धरून सांगितले. त्यावर राणीसाहेब यांनी माझे सतीचे जाणे ज्याचे दैवी असेल ते पाहतील असे उद्गार मुखातून काढले. सरनौबत यांचे डोळे तात्काळ गेले.

यावर सरनौबत घाबरले. त्यांनीे अहिल्याबाई राणीसाहेब यांची पायावर डोके ठेवून माफी मागितली. ‘ ‘ मी चुकलो ‘शमा करावी ‘ अशी विनंती केली. तेव्हा राणीसाहेबांनी ‘ ‘ ‘माझे सती जाणे पहावे ‘असे म्हणतात सरनौबतांना दृष्टी आली. त्यावेळी जमलेल्या सर्वानी ‘महाराजांचा काळ सिंहगडवर झालेला आहे. आणि आज तिसरा दिवस आहे’ असे सांगताच आपणाला ज्या दिवशी हे वृत्त समजले तोच मुख्य दिवस असल्याचे सांगून सती जाण्याचे साहित्य लवकर आणा. तुम्हास छत्रपती महाराज साहेबांच्या पायाची आण आहे ‘ असे सांगितले. तेव्हा मलकापूरहून सतीचे साहित्य आणावे लागेल, तर आता दिवस थोडाच राहिला आहे, सध्या दिवस फार धामधुमीचे आहेत, तशातच किल्ल्याचे काम चालू आहे आणि सतीचे साहित्य आणावयास रात्र होईल असे सांगितल्यावर राणीसाहेबानी ‘स्वार पाठवून साहित्य आणावे मी सती गेल्याशिवाय सूर्य अस्ताला जाणार नाही ” असे सांगितले.

rajaram maharaj wife name
rajaram maharaj wife name शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या चौथ्या राणीसाहेब अहिल्याबाई ऊर्फ अंबिकाबाई या सती

त्यावर सरनौबताचे मनात शंका आलेली पाहून rajaram maharaj wife name अंबिकाबाई राणीसाहेबानी सदरेवर सावली आलेली होती त्या ठिकाणी मातीचा एक छोटासा ढिगारा करून त्यावर पळसाचे एक पान खोचून ठेवले. ‘यास ओलांडून सावली जाणार नाही’ असे सांगताच सरनौबत यांनी ‘आज्ञेप्रमाणे स्वार पाठवतो पण त्यास येण्यास वेळ लागेल सूर्य अस्ता नंतर गडाचे दरवाजे बंद होतील राणीसाहेबानी राग मानू नये’ अशी विनंती केली. ‘आपण अस्तमान झालेस रागावणार नाही’ असे सांगितल्यावर स्वार रवाना झाला.

स्वार रवाना झाले पासून पळसाचे पानापासून सावली गेली नाही, प्रकाश आहे तसाच होता. डाक घेऊन गेलेला स्वार सतीचे साहित्य घेऊन गडावर परत आला. महाराजांचे पागोटे बरोबर घेऊन अंबिकाबाई राणीसाहेब सती गेल्या. गडावरील सर्वानी नंतर स्नानादी विधी करे पर्यंत प्रकाश दिसतच होता.सदरेस आलेनंतर चार तास रात्र झाली.अंधार दिसू लागला. हे पाहून गडावरील सर्वाना मोठे आश्चर्य वाटले. ‘सतीचा प्रताप’ या बाबतचे वृत्त नंतर पन्हाळ गडावर रामचंद्र पंत अमात्य यांचेकडे गडाहून लिहून पाठवण्यात आले. ते वाचून सर्वाना आश्यर्य वाटले.

छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू सिंहगडावर झाला त्यावेळी नाईक निंबाळकर घराण्यातील या कन्येचे वय अवघे चोवीस पंचवीस वर्षाच्या आसपास होते. सती जाण्यापूर्वी त्यांनी व्यक्त केलेला सूर्यास्ताबाबतचा अंदाज किती दृढ होता हे पाहून मनाला चटका लागल्याशिवाय राहत नाही.’ मी सती गेल्यावाचून सूर्य अस्ताला जाणार नाही.’ हे त्यांचे उदगार पाहून आजही अंगावर शहरे आल्याशिवाय राहत नाहीत.

नाईक निंबाळकर घराण्यातील या मुलीने वयाच्या अवघ्या २५ च्या आत बाहेर असताना छत्रपतींची राणी असूनसुद्दा छ. राजाराम महाराजांच्या निधनानंतर सती जाण्याचा दृढनिश्चय केला आणि मी सती गेल्याशिवाय सूर्याची सावलीही जागेवरून हलणार नाही तसेच मी सती गेल्याशिवाय सूर्य अस्तास जाणार नाही “असे विचार बोलून दाखवावेत यातून त्यांचे पातिव्रत्य, धर्म परायणता ‘ छत्रपती चरणी दृढभाव पाहून अशा राणीस कोणीही वंदन केल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतीची राणी झाल्यावर राजाराम महाराजांच्या निधनानंतर सती जाण्याचा दृढ निश्चय केलेल्या त्या राणीचे पतीव्रत, धर्मपरायनता ‘छत्रपती चरणी दृढभाव पाहून अशा राणीस कोणिही वंदन केल्याशिवाय राहणार नाही.
आजही विशाळगडावर एका चौथर्यावर दगडात कोरलेली दोन पावले दिसतात; ती छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई उर्फ अहिल्याबाई राणीसाहेब यांची समाधी आहे.

अशा या अंबिकाबाई ऊर्फ अहिल्याबाई यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा

 

 

 

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर 


संदर्भ 
थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र 
मल्हार रामराव चिटणीस 
सोलापूर जिल्ह्याचा इतिहास 
लेखक - गोपाळराव देशमुख

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Taimur khan - सध्याचा उझबेकिस्तान .. तिथला क्रूर शासक तैमूर
Taimur khan – सध्याचा उझबेकिस्तान .. तिथला क्रूर शासक तैमूर
error: Content is protected !!
%d bloggers like this: