marathi writer
marathi writer
marathi writer

marathi writer – प्रसिद्ध विनोदी साहित्यिक,पत्रकार वि. आ. बुवा

marathi writer - प्रसिद्ध विनोदी साहित्यिक,वक्ते,आणि पत्रकार वि. आ. बुवा यांचे आज पुण्यस्मरण.

marathi writer – प्रसिद्ध विनोदी साहित्यिक,

 पत्रकार वि. आ. बुवा

 

 

marathi writer – प्रसिद्ध विनोदी साहित्यिक,वक्ते,आणि

पत्रकार वि. आ. बुवा यांचे आज पुण्यस्मरण.

 

 

जन्म ४ जुलै १९२६; रोज पंढरपूर येथे झाला.त्याचे संपूर्ण नाव विनायक आदिनाथ बुवा असे होते.पण ते वि.आ.बुवा या नावानेच साहित्यिक क्षेत्रात प्रसिद्ध होते.त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूर व मिरज येथे झाले.वडिलांच्या अकाली निधनाने त्यांचे पुढील शिक्षण थांबले.मुंबई येथील व्ही.जे.आय.टी. महाविद्यालयात त्यांनी चरितार्थासाठी निवृत्तीपर्यंत वर्ष १९८६ पर्यंत नोकरी केली. विनोदबुद्धी, वक्तृत्व आणि सुंदर हस्ताक्षर हि त्यांना जन्मजात मिळालेली ईश्वरी देणगी होती.

याच जोरावर वर्ष १९५० मध्ये ” इंदुकला ” हे हस्तलिखित मासिक सुरु केले.या मधे चि.वि.जोशी,शांता शेळके,वसंत बापट, यांचे सारखे दिग्गज लेखकही लेखन करीत असत. marathi writerहे मासिक अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. marathi writer त्यांच्या लेखनामध्ये कथा, लघुकादंबरी, ललितलेख, एकांकिका, व्यक्तिचित्रे, लोकनाट्य अशी विविधता होती.अनेक क्षेत्रांत लेखन केले.समाजातील विविध प्रवृत्तीच्या व्यक्तिमत्वाचे सूक्ष निरीक्षण करून मर्म विनोदी भाषेत आपली कथानके रंगविली.

त्यांनी आकाशवाणी साठी ६०० कार्यक्रम दिले तसेच त्यांची ग्रंथ संपदा १५० चे वर पोचली होती.‘अकलेचे तारे’ हे त्यांचा कथासंग्रह असलेले पहिले पुस्तक वर्ष १९५३ प्रसिद्ध झाले.अकलेचे दिवे,अगा जे घडलेचि आहे,अघळ पघळ आणि ऐसपैस,अडाण्याचा गाडा,अथ बुवा उवाच अशी अनेक पुस्तकांची नावे घेता येतील. ‘उगीच काहीतरी’, ‘एकविसावा नग’ , ‘ओष्ठतंत्रम्’, ‘कशासाठी पैशासाठी’, ‘खटाटोप’, ‘खट्याळ काळजात घुसली’ हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सामान्य माणुस हा त्यांच्या marathi writer लेखनाचा केंद्रबिंदू असल्याने ते अल्पावधीत लोकप्रिय झाले.

त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकातूनच पुस्तकाचा विनोदी अंतरंग ओळखला जात असे.आकाशवाणीवरील त्यांच्या ” पुन्हा प्रपंच” या लोकप्रिय मालिकेच्या ४०० हून अधिक भागांचे लेखन त्यांनी केले होते.विविध मासिकातून तसेच पुस्तकातून १००० चेवर कथा त्यांनी लिहिल्या.त्यावेळचे दिवाळी अंक त्यांच्या लेखनामुळेच गाजत होते . हंस दिवाळी अंक, मोहिनी दिवाळी अंक, नवयुग दिवाळी अंक, आवाज दिवाळीअंक आणि कितीतरी मासिका मधून त्यांचे लेख प्रसिद्ध व्हायचे.प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना वृत्तपत्रातून लिखाणासाठी उद्युक्त केले आणि त्यांनी वृत्तपत्रातून विनोदी लेखनास प्रारंभ केला.

marathi writer तब्बल ६० वर्षे त्यांनी लेखन करून वाचकांना विनोदी पुस्तकांची भेट दिली तसेच आकाशवाणीसारख्या माध्यमातून श्रोत्यांचे रंजनही केले.विनोदी साहित्यात १५० पुस्तकांची निर्मिती हा विक्रम मनाला जातो.त्यांची इ.स.१९७२ मध्ये कल्याणमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपॅड भूषविले होते.वर्ष १९८३ मध्ये ‘ प्रेमाची एस्सो स्टाइल ‘ या पुस्तकाला तसेच वर्ष १९९७ मधे ‘ शंभरावे पुस्तक ‘ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट विनोदीसाहित्यासाठीचा पुरस्कार देणेत आला. विनोदी लेखक म्हणून मुंबई मराठी साहित्य संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार पण त्यांना वर्ष १९९७ मध्ये देणेत आला . चांगले वक्तृत्व असल्याने त्यांनी व्याख्याने व कथाकथनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही त्यांनी दौरे केले होते.

वर्ष १९८८ मध्ये त्यांचा धाकटा मुलगा विद्याधर याचे अपघाती तर, १९९६ मध्ये त्यांची पत्नी इंदुमती यांचे अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले. अखेरच्या दिवसांपर्यंत लेखन करणाऱ्या वि. आ. बुवा यांचे हृदयविकाराने १७ एप्रिल २०११ रोजी कल्याण येथे निधन झाले.त्यांच्या मागे विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, आणि दोन नातू आहेत.

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
capital city of maharashtra
capital city of maharashtra – मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र
error: Content is protected !!
%d bloggers like this: