role of media
role of media
role of media

role of media – पत्रकारिता, कम्युनिकेशन आणि सपाटीकरणाचे धोके

role of media - पत्रकारिता, कम्युनिकेशन आणि सपाटीकरणाचे धोके - सम्राट फडणीस

role of media – पत्रकारिता, कम्युनिकेशन

आणि सपाटीकरणाचे धोके

 

 

role of media – पत्रकारिता, कम्युनिकेशन आणि सपाटीकरणाचे धोके

 

 

 

14/8/2021

पत्रकारिता, कम्युनिकेशन आणि सपाटीकरणाचे धोके

पत्रकारीता (journalism) आणि संज्ञापन (communication) हे एकच आहेत, असं सातत्यानं सांगितलं आणि शिकवलं जातं. विशेषतः गेल्या दोन दशकांत कम्युनिकेशनमध्येच पत्रकारितेचा समावेश करण्याची विलक्षण घाई धोरणात्मक आणि शैक्षणिक प्रशासनाच्या पातळीवर आहे.

हा काही फक्त भारतातलाच प्रकार नाही; role of media जगभरात अनेक ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. आधी इंटरनेट आणि नंतर त्यावर आधारित डिजिटल माध्यमांचा वेगानं विकास झाला, तसं पत्रकारिता आणि कम्युनिकेशन हे एकच आहे, हे सांगण्याला अधिक धार आली.


गेल्या दशकभरात इंटर डिसिप्लनरी (बहुविद्याशाखा) शिक्षणाला महत्व आलं. ते जरूरीचं आहेच; तथापि त्याचा उपयोग प्रमुख विषयाचं (core subject) आकलन अधिक सजगपणे होण्यासाठी आहे; अनेक विषयांचं समग्र ज्ञान वगैरे इंटर डिसिप्लनरीमधून अपवादात्मक बुद्धिवंतानाच शक्य आहे.

फिजिक्समध्ये काम करू इच्छिणाऱ्याला मॅथेमॅटिक्सचं आवश्यक ते आकलन व्हावं, यासाठी फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्समध्ये इंटर डिसिप्लनरी शिक्षण हवं. मात्र, याचा अर्थ फिजिक्स हा मॅथेमॅटिक्सचाच भाग आहे, असा लावता येईल का?

इतिहास शिकायचा असेल, तर भुगोल माहिती हवा. मात्र, याचा अर्थ इतिहास हा भुगोलाचाच भाग आहे, असं मानता येईल का? एखादा विषय पूर्ण शिकण्यासाठी पुरक विषयांचं आवश्यक तितकंच आकलन झालं, तर मुळ विषय नीटसा समजावा, इतका इंटर डिसिप्लनरी शिक्षणाचा अर्थ असावा.

role of media पत्रकारिता शिक्षणाच्या बाबतीत हा प्रवास फार झपाट्यानं कम्युनिकेशनकडे सरकवला गेला. पत्रकारिता करण्यासाठी कम्युनिकेशन समजलं पाहिजे, हे अगदी शंभर टक्के मान्य आहे.


प्रिंट-ऑडियो-व्हिज्युअलमधून नीटपणानं कम्युनिकेशन साधता आलं, तर पत्रकारिता उत्तम करता येते, हे स्वाभाविक आहे. मात्र, म्हणून पत्रकारिता हा कम्युनिकेशनचाच एक भाग आहे, असं ठरवण्याची घाई झाली आहे.

या हिशेबानं भारतातले सारे वक्तृत्व स्पर्धा विजेते सर्वोत्तम पत्रकार असायला हवे होते. सारे उत्तम वक्ते, अभिनेते सर्वोत्तम पत्रकार असायला हवे होते. सर्वोत्तम पत्रकार उत्तम वक्ते, अभिनेते असायला हवे होते. असं नाहीय, कारण या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत, त्यातली एक दुसऱ्याला पुरक आहे; मात्र दोन्ही एकच नाही आहेत.

कम्युनिकेशनमध्ये मार्केटिंग आहे, विकासात्मक आहे, कॉर्पोरेट वगैरेही आहे. पत्रकारितेत पत्रकारिता आहे. पत्रकारिता शिकण्यासाठी मार्केटिंग, विकासात्मक, कॉर्पोरेट कम्युनिकेशन यायला काही हरकत नाही; मात्र मार्केटिंग, विकासात्मक, कॉर्पोरेट असे कम्युनिकेशनचे प्रकार आले म्हणजे पत्रकारिता झाली, असं अजिबात होऊ शकत नाही.


म्हणजे पत्रकारिता ही पूर्णतः स्वतंत्र विद्याशाखा आहे. role of media  ही विद्याशाखा प्रामुख्यानं आधुनिक लोकशाहीचा गाभा आहे. ती एकांतात बसून आकलन होणारी विद्याशाखा नाही. पत्रकारिता समाजाच्या मध्यवर्ती, मध्यवस्तीत आणि गर्दीतच असली पाहिजे. मरणाच्या ट्रॅफिकमध्येच पत्रकारिता हवी. फेरिवाल्यांच्या गर्दीचा ती भाग हवी. तरच ‘हे असं का,’ हा प्रश्न पडू शकतो. तो प्रश्न ‘तुम्ही हे का करत नाही’, असं व्यवस्थेला विचारणं सुचू शकतं.


व्यवस्थेला योग्य प्रश्न योग्य वेळी विचारण्याचं शिक्षण पत्रकारितेत आहे. देशासमोर लाखभर प्रश्न सताड तोंड उघडून पडून असताना पंतप्रधान समोर आले, तर ‘तुम्ही आंबे कसे खाता,’ हे विचारणारा पत्रकार असू शकतो का? तो उत्तम मार्केटिंग कम्युनिकेटर जरूर असू शकतो; पत्रकार नाही.

हजारो कोटी रूपयांची संपत्ती अस्ताव्यस्तपणे बाळगणारी व्यक्ती ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून समोर येते, तेव्हा तिचं गुणगाण गाणारा उत्तम कम्युनिकेटर असू शकतो; पत्रकार नाही.

शेकडो रोजगार जात असताना ‘कंपनीचे व्यवस्थापन’ या विषयावर बोलणारा उत्तम कॉर्पोरेट कम्युनिकेटर असू शकतो; पत्रकार नाही.

मुद्दा कम्युनिकेटर दुय्यम वगैरे असा नाही. उत्तम कम्युनिकेटर आणि उत्तम पत्रकार दोन्हींची समाज म्हणून आवश्यकता आहेच; मुद्दा दोघांना एक समजणं आणि कम्युनिकेटर म्हणजेच पत्रकार अशी व्याख्या करत नेण्याचा आहे.


role of media पत्रकारिता ही प्रश्न विचारणारी, प्रश्न विचारत विचारत संभाव्य उत्तरांच्या शोधात राहणारी विद्याशाखा आहे. भले अतुलनीय बुद्धिवान नसेल; पण चौकस बुद्धी विकसित करणारी विद्याशाखा आहे.

या विद्याशाखेच्या विकासासाठी अभ्यासक्रमाची चौकट आहेच आणि त्या चौकटीचा लाभ निश्चित झाला. नंतर कम्युनिकेशन नावाच्या दरवाजाआड पत्रकारितेला सर्वशक्तीनिशी ढकलण्याचा उद्योग जोमात सुरू झाला आहे. तो सामान्य नागरीक म्हणूनही समजून घेतला पाहिजे.

मग पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटचे कम्युनिकेशनमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव हा फक्त हजार-पंधराशे पत्रकारांच्या भावनेचा विषय नव्हे; तर समाजातल्या टोकदार व्यवस्थेचं सपाटीकरण होण्याचा आहे हे समजून येईल.

सपाटीकरण करायचं की समाजातलं भलं-बुरं मांडणारी पारदर्शी विद्याशाखा टिकण्यासाठी आग्रह धरायचा हा ज्याच्या त्याच्या एकूण सामाजिक आकलनाच्या परिघाचा प्रांत आहे.


सपाटीकरणातून सर्वपक्षीय-सर्व विचारधारांचे उत्तम भक्त, उत्तम ट्रोल्स तयार होऊ शकतात. समाजाला रॅशनॅलिटीकडं खेचत नेणारा पत्रकार तयार होऊ शकत नाही, हे निश्चित.

- सम्राट फडणीस


Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
communal riots - पश्चिम बंगालमधील राजकारणात हिंसाचार
communal riots – राजकारण आणि हिंसाचार
error: Content is protected !!
%d bloggers like this: