Save environment save life
Save environment save life
Save environment save life

Save environment save life – दंडकारण्य अभियान

पर्यावरण चळवळ - Save environment save life

Save environment save life – दंडकारण्य अभियान

 

 

पर्यावरण चळवळ – Save environment save life

समीर मणियार

 

 

 

करोना साथरोगाने लोकांच्या जगण्याची परिभाषा बदलली आहे. एक वेळ अशी आली होती की, वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सीजनची

टंचाई निर्माण झाल्यामुळे बहुतांश रुग्णांना लाखमोलाचे प्राण गमावण्याची नामुष्की आली होती. ग्लोबल वार्मिंगचे परिणाम आज सारे जग भोगत आहे.

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ, गारपीट, दुष्काळ आणि पाणी टंचाई, हवेतील प्रदूषण यामुळे मनुष्यप्राणी हैराण आहे.

विकासाच्या नावाखाली येणारे महाकाय प्रकल्प आणि त्यातील लोकांचे नव्हे तर वन्यजीवसृष्टी, जंगल, जमीन आणि पाणी यांचेही मोठे नुकसान होत आहे.

भूगर्भातील पाण्याचा साठा खोलवर जात आहे. काही राक्षसी पिकांमुळे शेतकऱ्यांच्या क्षारपड जमिनी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

या साऱ्या प्रश्नांचा धांडोळा लक्षात घेतला तर भविष्यात पर्यावरणाचे प्रश्न आणखी कठीण होणार आहेत असे दिसते.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा, डॉ. बाबा आमटे, मेधा पाटकर, कुसूमताई कर्णिक, विनायकराव पाटील,

मोहन धारिया, नानाभाऊ एंबडवार, आचार्य विनोबा भावे, जगदीश गोडबोले अशा असंख्य माणसांनी काम केलेले आहे.

पश्चिम घाट बचाव आंदोलन यासारख्या अनेक चळवळी झाल्या आहेत. अवर्षणप्रवण भागात म्हणजेच

दुष्काळी भागाचा कायापालट करायचा असेल तर वनीकरणाशिवाय पर्याय नाही.

प्रथम डाव्या विचारांच्या मुशीत घडलेले आणि नंतरच्या काळात ग्रामविकास, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ

रोवणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्याच्या सायंकाळी जून २००६ मध्ये दंडकारण्य अभियान Save environment save life सुरु केले.

संगमनेर अकोले तालुक्यातील पठारी, दुष्काळग्रस्त, डोंगरी भागातील माळरानावर लोकसहभागातून भाऊसाहेब थोरात यांनी

हिरवी वनराई निर्माण करण्याचा संकल्प केला. तो संकल्प वास्तवात येताना सध्या दिसत आहे.

आल्प्स पर्वतात एल झिअर्ड बुफे या अवलियाने ३५ वर्षात निर्माण केलेल्या हरित पट्ट्याच्या वनसृष्टीच्या कर्तृत्वाचा भाऊसाहेब थोरात यांच्या मनावर प्रभाव पडला.

कोणताही विचार मनाला तावून सुलाखून पटल्यानंतर भाऊसाहेब थोरात यांनी पाऊणशे वयोमान झाल्यानंतर दंडकारण्य अभियान Save environment save life करण्याचा संकल्प हाती घेतला.

हरित चळवळीसाठी वनीकरण करण्याच्या कामासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. यासाठी भाऊसाहेबांनी लोकांना

संघटित करून त्यांनी एका अर्थाने ग्रीन आर्मीची स्थापना केली. हजारो लोक, महिला, तरुणाई, विद्यार्थ्यांना संघटित करुन

२००६च्या पावसाळ्यात संगमनेर अकोले भागातील १३२ गावातील माळरानावर एक कोटी झाडांची बियाणे लावण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले.

प्रकृती बरी नसतानाही या सामाजिक उद्दिष्टांसाठी त्यांनी जनजागृती सुरु केली. पुढच्या वर्षी या परिसरात चार कोटी बियाणे

माळरानावर टाकले जाईल अशी व्यवस्था केली. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी नवी लोक चळवळ उभी केली. ती आता यशस्वी होताना दिसत आहे.

गाणी, भाषणे, पोवाडे अशा विविध मार्गाने त्यांनी या नव्या हरित पट्टा निर्माणासाठी लोकजागर सुरु ठेवला.

२००६ ते २०२१ या दीड दशकाच्या काळात लक्षावधी संख्येने या भागातील माळरानावर बी बियाणे टाकण्यात आली. रोपे लावण्यात आली.

त्यातील काही जगली टिकली. पण झाडे लावण्याचा वसा आणि वारसा सहकार महर्षि भाऊसाहेब संतुजी थोरात यांचे चिरंजीव

विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे सर्व सहकारी दंडकारण्य चळवळ लोकांच्या सहभागातून आज पुढे नेत आहेत.

अमृत उद्योग समूह आणि जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त पुढाकाराने आतापर्यंत सुमारे ८६ लाख लावलेली

झाडे जगविण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे माळरानावर समृद्ध हिरवाई डोलू लागली आहे.

यंदाच्या वर्षी वडगाव पान येथील पद्मावती डोंगरावर दंडकारण्य अभियानाची सुरुवात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात झाली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेतील व्यासंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, दंडकारण्य अभियानच्या प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, संगमनेर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सुनंदाताई जोर्वेकर, जिल्हा परिषदेच्या मीरा शेटे आदींसह अभियानातील अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Save environment save life 2
Save environment save life 2

दंडकारण्य अभियानातून Save environment save life आजतागायत लोकसहभागातून सुमारे ८६ लाख झाडे लावण्यात आली आहेत. यात चिंच, जांभूळ, काशीद, खैर, सुरु, शिसम, बांबू, रेन ट्री, लिंब, भेंडी, आवळा, बाभूळ, सीताफळ, ऑस्ट्रेलियन बाभूळ, वड, पिंपळ, करवंद, निलगिरी, पळस, बेल, उंबर गिरीपुष्पाचा समावेश आहे.

संगमनेर तालुका हा कमी पावसाचा आहे. दुष्काळ आणि वातावरण बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दूरदृष्टीतून १६ वर्षापूर्वी दंडकारण्य अभियान सुरु केले. यात मोठा लोकसहभाग असल्यामुळे खऱ्या अर्थाने लोक चळवळ ठरली आहे. संगमनेरमधून सुरु झालेली वृक्ष संवर्धन संस्कृती राज्याला निश्चितच दिशादर्शक ठरणारी आहे, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात केलेले विनम्र आवाहन रास्तच आहे. काँग्रेस पक्षातंर्गत सध्या सुंदोपसुंदीचे राजकारण सुरु असताना शांत, संयमी, व्यासंगी अभ्यासक असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी निसर्ग संरक्षणासाठी भाऊसाहेबांचा वैचारिक वारसा समर्थपणे पुढे नेताना ते त्यांच्या संस्कृतीतून व्यक्त होत आहे.

आयुष्याच्या शेवटच्या टप्यात हरित पट्टा, हिरवाई आणि माळरानावर वनराईचा ध्यास घेऊन त्या दंडकारण्य अभियानाच्या यशस्वीतेसाठी भाऊसाहेबांनी सुरु केलेले अभियान त्यांची पुढच्या पिढीतील मंडळी आणि थोरात यांना मानणारी सर्वपक्षीय मंडळी हा विचार पुढे नेताना एक अनोखे दृश्य प्रवरा नदीच्या खोऱ्यात पाहण्यास मिळत आहे. बहुचर्चित रखडलेले निळवंडे धरणाचा प्रकल्पही मार्गी लागण्याच्या अंतिम टप्यात आहे. लोक सहभागातून लक्षावधी झाडे लावून ते वास्तवात आणणारे, आधुनिक दंडकारण्याची निर्मिती करणारा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हे वनऋषी होते असे म्हणणे रास्त ठरेल.

Save environment save life 1
Save environment save life 1

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राबविलेली दंडकारण्याची आधुनिक चळवळ. या चळवळीने लाखो लोकांना जगण्याचा आधार दिला. माणसाच्या नैतिक अधःपतनातून आणि लोभामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, असे भाऊसाहेब थोरात नेहमी सांगत असत. लोकांचे प्रश्‍न समजावून घेत संयमी वृत्तीने काम करित राहणे. यासाठी जी त्यागी वृत्ती लागते, त्याचा आदर्श वस्तुपाठच भाऊसाहेब थोरात यांनी आपल्या कार्यातून लोकांपुढे मांडला. दरवर्षी एक जुलै ते १५ ऑगस्ट या काळात माळरान, डोंगर, बांध, रस्ते, शक्य त्या ठिकाणी वृक्षारोपण केले जाते. आपणही या दंडकारण्य अभियानात सहभागी होऊया..Save environment save life

 

 

 

समीर मणियार,

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
I am a looser
I am a looser – देवेंद्र फडणवीस नावाचे तरूण आणि दारूण अपयश
error: Content is protected !!
%d bloggers like this: