social networking essay
social networking essay
social networking essay

social networking essay – नेटवर्किंग ( जनसंपर्काचे जाळे ) आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी

social networking essay - नेटवर्किंग ( जनसंपर्काचे जाळे ) आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी

social networking essay – नेटवर्किंग ( जनसंपर्काचे जाळे ) आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी

 

social networking essay – नेटवर्किंग ( जनसंपर्काचे जाळे ) आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी

 

 

 

 

 

रोहन हा त्याच्या ऑफिसमध्ये नेहमी सर्वाना त्यांच्या कामात मदत करायचा. त्याच्या कामात पण तो खूप हुशार होता.

फक्त स्वतःच्या डिपार्टमेंट मध्ये नव्हे तर जवळपास

सर्वचं ऑफिस कर्मचारी त्याला ओळखायचे. अगदी जगत  मित्र म्हणा ना .  त्याच्या कडे कोणतीही जादूची शक्ती नव्हती तर ह्याचं एकचं  कारण होतं ते म्हणजे तो सर्व गोष्टी शिकण्यात ,

समजून घेणयात नेहमी पुढाकार घ्यायचा. त्याला लोकांशी बोलायला ,त्याच्या  कामा  बद्दल जाणून घ्यायला आवडायचं आणि अश्या प्रकारे त्याची विविध  क्षेत्रातील मित्र यादी

सुद्धा वाढत होती. कोणाला काही सल्ला हवा असेल तर पटकन रोहनचं सर्वाना आठवायचा. जेव्हा कंपनीने नवीन ऑफिस देशाबाहेर चालू करायचे ठरवले तेव्हा

मॅनेजर म्हणून पहिलं नाव रोहनचचं होतं .

खरचं आहे ! जर तुम्ही  आपल्या कंपनीच्या लोकांशी , आपल्या क्षेत्रातल्या (field) लोकांशी , शिवाय इतर क्षेत्रातल्या लोकांशी जितके जास्त जोडले जातात तितके तुमचे

नेटवर्क वाढते. त्याचा तुमच्या व्यावसायिक प्रगतीसाठी नक्कीचं खूप फायदा होतो. आर्थिक संकट, मंदी,महामारी , नैसर्गिक आपत्ती ह्या गोष्टी काही सांगून येत नाही.

आपण  फक्त आपल्यापरीने त्याला मुकाबला करण्यासाठी तयार राहू  शकतो आर्थिक नियोजन करून आणि आपल्या स्वतःच्या क्षमता वाढवून,विकसित करून.

सर्व जग जेव्हा महामारीच्या संकटाला तोंड देतयं त्यात बऱयाच जणांच्या नोकऱ्या गेल्या.सुमनच्या ऑफिसमध्ये सुद्धा आर्थिक ओढा-ताण  जाणवतं होती.

आधीचं नोकरी शोधलेली बरी ,म्हणून तिने एक-दोन लोकांशी बोलून ठेवले होते. अगदी  घराजवळ चांगल्या कंपनीत तिला नोकरी मिळाली .ह्या कंपनीच्या

मॅडम आणि तिची ओळख  एका सेमिनारला झाली  होती आणि ती त्याच्या संपर्कात होती. झाला की नाही नेटवर्किंगचा फायदा ??

काय करता  येईल आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी नेटवर्किंग वाढवायला :

1. आपण सामाजिक माध्यमे वापरून आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या संपर्कात राहू शकतो.

2. सेमिनार्स,वेबिनार, इतर गोष्टी अटेंड करून आपणं अजून लोकांशी जोडले जाऊ शकतो.

3. व्यवसायिक संघटनेचा भाग बनू शकतो. नियमित त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकतो.

4. आपल्या छोट्या-मोठ्या achievements आपल्या नेटवर्क मधल्या लोकांना मेल/ संदेशाद्वारे सांगू शकतो.

5. आपल्या नेटवर्क मधल्या व्यक्तीने चांगली कामगिरी केली तर नक्कीचं तसा त्यानां कौतुकाचा अभिप्राय देऊ शकता .

6. व्यापार मेळावा आणि प्रदर्शन (trade fair and exhibitions) हे नवीन लोकांना भेटण्याचे उत्तम व्यासपीठ आहे.

7. आपल्या क्षेत्रातल्या व्यावसायिक गटात सामील होऊ शकता.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

8. कंपनीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला हजेरी लावू शकता. त्या प्रशिक्षकाचा संपर्कांत राहू शकता.

9. ह्या क्षेत्रांतल्या लोकांचं मार्गदर्शन घेत राहा. तज्ञ व्यकतींचे ज्ञान हे नेहमी मौल्यवान असतं.

ह्या सगळ्या साठी तुम्हाला सुद्धा तयार राहावं लागणारं आहे . त्यासाठी तुम्ही स्वतःची २/३ वाक्यात तुमचे शिक्षण, कौशल्ये ,अनुभव अशी ओळख तयार करा ,

अगदी  short पण प्रभावी अशी. तुम्ही काय कसं बोलणारं ,मांडणारं हे मनांत तयार ठेवा.हवं तर त्याचा सराव करा. जेव्हा कोणी तुमच्याशी संवाद साधेल तेव्हा

तीच ओळख करून द्या. आपल्या संपर्कासाठीची माहिती म्हणजे मोबाईल नंबर ,ई-मेल id असलेले  business card नेहमी बाळगा आणि योग्य व्यक्तीला नक्की द्या.

नेटवर्किंग / जनसंपर्काचे जाळे म्हणजे आपण एक दीर्घकालीन संबंध निर्माण करण्याचे कामं करत असतो.

इथे ते जपणे पण महत्वाचे आहे,एक व्यक्ती म्हणून आपल्यातला

व्यावसायिकपणा खूप महत्वाचा असतो. शिकणे आणि ऐकणे (चांगला श्रोता )हे चालूचं ठेवायचे हे नक्की.  जितकी आपली मनोवृत्ती आपणं शिकण्यासाठी तयार ठेवू तितका

आपल्याला त्याचा फायदा होतो. एकमेकांशी संवाद साधणे त्यातून चांगले घेणे ही वृत्ती तुम्हाला संपर्काची व्याप्ती वाढवायला मदत करते.

प्रत्येक कर्मचाऱ्याने / व्यायसायिकाने  आपले जनसंपर्काचे जाळे अर्थात नेटवर्किंग वाढवले पाहिजे ,जोपासले पाहिजे. जितके आपले हे जनसंपर्काचे जाळे जास्त तितके अशा

देवाणघेवाणीमधून परस्परांची व्यावसायिक, आर्थिक प्रगती जास्त ! आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हे अशक्य नक्कीचं  नाही  पण त्यासाठी सातत्याने संपर्कात रहा, लोकसंग्र्ह वाढवा.

 

postboxindia.com
www.postboxindia.com
मेघना धर्मेश
9321314782

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
honesty is the best policy
honesty is the best policy – न्हावा – शेवा पोलीस स्टेशन
error: Content is protected !!
%d bloggers like this: