vilasrao deshmukh
vilasrao deshmukh
vilasrao deshmukh

vilasrao deshmukh – आदरणीय कै.विलासरावजी देशमुख

vilasrao deshmukh - आदरणीय कै.विलासरावजी देशमुख यांना स्मृतिदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

vilasrao deshmukh – आदरणीय कै.विलासरावजी देशमुख

 

vilasrao deshmukh – आदरणीय कै.विलासरावजी

देशमुख यांना स्मृतिदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

आदरणीय कै.विलासरावजी देशमुख यांना स्मृतिदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

महाराष्ट्राचे मंत्री असोत
राज्याचे मुख्यमंत्री असोत , काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च
अशा वर्किंग कमिटीचे ( CWC ) सदस्य असोत
किंवा केन्द्रीय मंत्री असो अत्यंत व्यस्त असतांनाही
सर्वसामान्याच्या मोबाईल मेसेज ला tnx – ok असा
reply न चुकता तत्परतेने देणारे ,राजकारणातले “राजहंस “विरळे व्यक्तिमत्व,
प्रचंड लोकसंपर्काचा ‘धनी’ मित्राचा सदह्रयी मित्र ,
कार्यकर्त्यांचा सक्षम नेता ,
सर्वसामान्यांचा ‘ जाणता राजा ‘
आणी आदर्श कुटूंब प्रमुख .vilasrao deshmukh विलासराव देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण बाबुळगावातच झाले.

ते पुढे पुणे शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी आले, मग त्यांनी गरवारे कॉलेजमधून बी.एस्सी पदवी मिळवली.

पुण्याच्या लॉ कॉलेजमधून एल.एल.बी. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी शिवाजीराव दुर्वे या सुप्रसिद्ध वकिलाकडे

पुण्यात वकिलीस सुरुवात केली. काही काळ पुण्यात राहिल्यानंतर १९७१ मध्ये ते गावाकडे परतले.

तिथल्या न्यायालयात वकिली करत असताना सर्व मंडळीही परिचयाची ,तेव्हा कोणाला फी मागायची असा

त्यांना प्रश्न पडे. त्यामुळे न्यायालयातील कामे अशी ही कोणाची न फी घेताच आपण करतो तर मग आपण

सामाजिक कामे मोफत केली तर अधिक चांगले नाही का असा विचार करून vilasrao deshmukh

विलासराव देशमुख हे सामाजिक कामाकडे वळले.विलासराव देशमुख यांनी १९७४ मध्ये बाबूळ गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली.

१९७४ ते १९८० दरम्यान त्यांनी लातूर पंचायत समितीच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला.

उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी पंचसूत्री कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केला.

जिल्ह्यातील तरुणांना काँग्रेसच्या झेंड्याखाली संघटित करून ते काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले. लातूर येथून

१९८० मध्ये प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले व त्यात मतदारसंघातून १९८५ आणि १९९० मध्ये पुन्हा

निवडून आले ते लवकरच मराठवाडा भागातील काँग्रेसचे लोकप्रिय नेते झाले.यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणात पाय रोवण्यास सुरुवात केली. १९८० ते १९९५ पर्यंत ते सलग तीनदा

आमदार म्हणून राज्य विधानसभेवर निवडून आले. या कालावधीत त्यांनी गृह, सार्वजनिक प्रशासन,

सहकार, उद्योग ,ग्रामीण विकास, शिक्षण ,तंत्र शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा कार्यभार

सांभाळला. विलासराव देशमुख यांचा कारभार अतिशय स्वच्छ व चोख होता.त्यांच्या कार्यकाळातमध्ये

भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर कधी झाला नाही व कधी कोर्टाने त्यांना फटकारले नाही. हे त्यांचे

विशेष सांगता येईल.


आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात अनेक जनसामान्यांसाठी योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे

व त्यांना गरिबीतून वर काढण्याचे प्रयत्न विलासराव देशमुख यांनी केलेले दिसून येतात. त्याच बरोबर राज्यातील

उद्योग, सेवाक्षेत्र, पायाभूत सुविधा वाढवून महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य असले पाहिजे असा त्यांचा कायम

आग्रह असायचा. व त्या दृष्टीने अनेक चांगल्या योजनेचा आपल्या कार्यकाळात निर्णय घेतले व त्याची

अंमलबजावणीही केली.
विलासराव देशमुख vilasrao deshmukh यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्य

माणसाचा त्यांचा असणारा संवाद ,त्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले ते नेते होते.संकटात जो यशस्वी होतो तो खरा प्रशासक. विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक

संकटावर मात करत प्रशासनावर आपली मजबूत पकड असल्याचे सिद्ध केले होते.त्यांची स्मृती राज्याला

सतत प्रेरणादायी ठरेल.
” संपतील शब्द मात्र आपल्या कर्तुत्वाच्या गाथा अनंत राहतील” माणसे पदाने नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वाने

मोठी होतात हे स्वर्गीय विलासराव देशमुख देशमुख साहेब यांच्या जीवन प्रवासातून कळते.

आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर


Advertisement

More Stories
Together we can change the world कोरोना नंतरचे जग - आनंद शितोळे
Together we can change the world – कोरोना नंतरचे जग
error: Content is protected !!
%d bloggers like this: